Homeताज्या घडामोडीShiv Sena UBT : कोकणात उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली; मेळाव्याला अनेक आमदार,...

Shiv Sena UBT : कोकणात उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली; मेळाव्याला अनेक आमदार, खासदारांची गैरहजेरी

Subscribe

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकांसाठी सर्वपक्षीय नेतेमंडळींनी आपलं लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांकडे वळवलं आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट दोन्ही शिवसैनिकांनी जोरदार तयारी सुरू केली असून दोन्ही गटाचा गुरुवारी मुंबईत कार्यक्रम पार पडला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अंधेरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा पार पडला तर, बीकेसी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा शिवोत्सव पार पडला.

मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकांसाठी सर्वपक्षीय नेतेमंडळींनी आपलं लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांकडे वळवलं आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट दोन्ही शिवसैनिकांनी जोरदार तयारी सुरू केली असून दोन्ही गटाचा गुरुवारी मुंबईत कार्यक्रम पार पडला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अंधेरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा पार पडला तर, बीकेसी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा शिवोत्सव पार पडला. मात्र, या कार्यक्रमांदरम्यान आमदार, खासदारांच्या अनुपस्थितीचा मुद्दा चांगला चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे आमदार, खासदारांच्या अनुपस्थितीमुळे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं टेंशन वाढवलं आहे. कारण आजी-माजी आमदार आणि खासदार गैरहजर होते. त्यामुळे पुढील राजकारण ठाकरेंसोबत हे अनुपस्थित आमदार, खासदार राहणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. (Shiv Sena UBT Uddhav Thackeray Shiv Sena Eknath Shinde Balasaheb Thackeray Birh Anniversary Vaibhav Naik On Vinayak Raut)

अंधेरीतील येथील छत्रपती शहाजी महाराज स्टेडिअममध्ये (अंधेरी स्पोर्ट्स काँप्लेक्स) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचा मेळावा घेत भाष्य केलं. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या मेळाव्याला अनेक आजी-माजी आमदार आणि खासदार गैरहजर असल्याचे पाहायला मिळालं. त्यानुसार, माजी आमदार राजन साळवी, वैभव नाईक, आमदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार संजय दिना पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार बंडू जाधव, खासदार संजय देशमुख, आमदार दिलीप सोपल यांच्यासह अनेक विद्यमान आमदार आणि खासदारांची अनुपस्थिती दिसली.

उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यातील अनुपस्थित आमदारांपैकी माजी आमदार वैभव नाईक आणि राजन साळवी हे सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. कारण मागील दिवसांपासून वैभव नाईक आणि राजन साळवी हे ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशात अंधेरीतील मेळाव्यालाही नाईक व साळवी हे दोन्ही माजी आमदार अनुपस्थित होते. मात्र, असं असलं तरी माजी आमदार वैभव नाईक यांनी आपण शिवसेना ठाकरे गटासोबत कायम राहणार असल्याचं आपलं महानगरशी बोलताना सांगितलं. परंतू, राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांच्याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

वैभव नाईक, राजन साळवींची विनायक राऊतांवर नाराजी

दरम्यान, वैभव नाईक आणि राजन साळवी हे कोकणातील पराभूत आमदार आहेत. त्यामुळे या दोन्ही आमदारांची नाराजी उद्धव ठाकरे यांच्यासाठी कोकणात डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे वैभव नाईक आणि राजन साळवी यांच्या नाराजीला माजी खासदार विनायक राऊत कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. कारण लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासून कोकणात विनायक राऊत यांच्याकडून होत असलेल्या कार्यपद्धतीवर दोन्ही आमदार नाराज आहेत. तसेच, दोन्ही आमदारांनी याआधी विनायक राऊत यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत मातोश्रीवर तक्रारही दाखल केली होती. याशिवाय, शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे गटनेते भास्कर जाधव यांनीही नाराजी व्यक्त करत विनायक राऊत यांची मातोश्रीवर तक्रार दाखल केली होती. परिणामी कोकणातील डोखेदुखी दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे आगामी काळात विनायक राऊत यांना समज देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिंदेंच्या शिवोत्सवात माजी आमदार तानाजी सावंत अनुपस्थित

मुंबईतील बीकेसी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या शिवोत्सवाला राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि विद्यमान आमदार तानाजी सावंत गैरहजर होते. मागील काही दिवसांपासून आमदार तानाजी सावंत हे नाराज आहेत. नव्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने तानाजी सावंत नाराज असल्याचे बोललं जात आहे. याच कारणात्सोव तानाजी सावंत बीकेसीतील शिंदेंच्या शिवोत्सवाला गैरहजर राहिल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याशिवाय, धारशिव जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी आमदार प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर प्रताप सरनाईक धाराशिव येथे गेले असता, त्यांच्या स्वागताकरिता लावण्यात आलेल्या बॅनरवर तानाजी सावंत यांचा फोटो नव्हता. त्यामुळे आगामी काळात तानाजी सावंत वेगळा निर्णय घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा – Sanjay Raut : 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला शिवसेना ठाकरे गटाची संविधान आणि भारतमाता पूजन मिरवणूक – राऊत