घरक्राइमदापोली रिसॉर्ट प्रकरण : अनिल परबांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना ईडीकडून समन्स

दापोली रिसॉर्ट प्रकरण : अनिल परबांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना ईडीकडून समन्स

Subscribe

शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स जारी केला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स जारी केला आहे. दापोली येथील रिसॉर्ट बांधकामावेळी पर्यावरण संरक्षण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सदानंद कदम यांच्यासह अनिल परबांचे जबाब नोंदवण्यात आले होते. (Shiv sena Uddhav Balasaheb Thackerays Leader Anil Parab Supporter Sadanand Kadam Has Been Summoned By Ed In Mumbai)

रिसॉर्टच्या बांधकामाशी संबंधित महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन कायद्यांतर्गत पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच सदानंद कदम यांच्याविरोधात दुसरा एफआयआर नोंदवला होता. या एफआयआरनंतर ईडीने त्यामध्ये नमूद केलेल्या तपशीलांची तपासणी करण्याचा आणि कदम यांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

सक्तवसुली संचालनालयाने परब आणि कदम यांच्याविरुद्ध मे महिन्यात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता ईडीने सदानंद कदम यांना समन्स पाठवत पुढील आठवड्यात चौकशीसाठी बोलावले आहे. अनिल परब यांनी दापोलीतील रिसॉर्ट स्वस्त दरात कदम यांना विक्री केले. तसेच यामध्ये मोठ्या प्रमाणात गैर व्यवहार झाला, असा संशय ईडीला आहे.

शिवाय, येत्या 14 डिसेंबर रोजी अनिल परबांना चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. दापोली कोर्टाने साई रिसॉर्ट घोटाळ्यासंदर्भात अनिल परबांना समन्स बजावले आहे. पर्यावरण मंत्रालय, भारत सरकारने CRZ मध्ये बांधकाम केल्याप्रकरणी कोर्टात तक्रार दाखल केली होती. तो वेगळा खटला दापोली न्यायालयात सुरू आहे.

- Advertisement -

दापोली तालुक्यातील मुरुडमधील वादग्रस्त साई रिसॉर्टप्रकरणी ही सुनावणी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पंचायत समिती गटविकास अधिकारी रुपा दिघे यांनी शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी भा.द.वि. ४२० नुसार अनिल परब यांच्यासह मुरुड ग्रामपंचायत तत्कालीन सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांच्याविरोधात दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.


हेही वाचा – कागदाचे विमान बनवून उडवणाऱ्यांना आता भारतातच विमाने बनविण्याची संधी – नरेंद्र मोदी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -