रिक्षावाल्याची रिक्षा होती सुसाट, पण त्याला ब्रेकचं नव्हता; उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 41 हून आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. यामुळे मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या घटनेमुळे उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा नवा राजकीय वाद सुरु झाला आहे. दोघही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यातच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजही रिक्षावाला म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती. त्याला ब्रेक नव्हता. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. शिवसेनेच्या वतीने आज महिला पदाधिकाऱ्यांची मार्गदर्शन आयोजित करण्यात आली होती. यावेळी यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. या बैठकीतच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातातील माईक आपल्याकडे खेचला, पुढे काय काय खेचतील ते माहीत नाही. पुरुषांनी दगा दिला परंतु महिलांनी साथ दिली. महिला पाठीशी उभ्या राहिल्या, यामुळे या पुढे आता शिवसेनेत महिलांना प्राधान्य देणार असल्याची ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

यावेळी बोलताना शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, सर्व महिलांनी ताकदीने बंडखोर लोकांच्या समोर जाऊन शिवसेना वाढवू आणि बंडखोरांना गाडू, असा प्रण केला आहे. काही काळ जावा लागतो. त्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना पुढे जाईल.


अमित शहा, उद्धव ठाकरे पोस्टरवरून गायब, चर्चा तर होणारच!