घरताज्या घडामोडीठाकरे vs शिंदे : शिवसेना ठाकरेंचीच, 'त्या' फुटीला काहीच अर्थ नाही; कपिल...

ठाकरे vs शिंदे : शिवसेना ठाकरेंचीच, ‘त्या’ फुटीला काहीच अर्थ नाही; कपिल सिब्बल यांचा दावा

Subscribe

शिवसेना पक्ष कुणाचा आणि चिन्ह कोणाचे याचा वाद सध्या केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू आहे. मागील सुनावणीत शिंदे गटाने बाजू मांडली असून, आजच्या सुनावणीत ठाकरे गट आपली बाजू मांडत आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल निवडणूक आयोगासमोर बाजू मांडत आहेत.

शिवसेना पक्ष कुणाचा आणि चिन्ह कोणाचे याचा वाद सध्या केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू आहे. मागील सुनावणीत शिंदे गटाने बाजू मांडली असून, आजच्या सुनावणीत ठाकरे गट आपली बाजू मांडत आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल निवडणूक आयोगासमोर बाजू मांडत आहेत. यावेळी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच असून, फुट पडली आहे तिला काहीच अर्थ नाही, असे कपिल सिब्बल यांनी म्हटले. दरम्यान, १० तारखेला झालेल्या सुनावणीत शिंदे गटाचे वकिल महेश जेठमलानी यांनी आमच्याकडे संख्याबळ आहे असे म्हटले होते. त्यांचा हाच मुद्दा आज कपिल सिब्बल यांनी खोडून काढला आहे. (Shiv Sena Uddhav Thackeray Kapil Sibal Election Commission)

केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या सुनावणीत वकील कपिल सिब्बल ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. यावेळी “उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. शिवसेनेत फूट पडलेली नाही. जी फूट पडल्याचे भासवले जातेय ती एक कल्पना आहे” असा दावा कपिल सिब्बल यांनी केला आहे.

- Advertisement -

“मागील सुनावणीत एकनाथ शिंदे यांच्या गटाने जे दावे केले होते, ते सर्व दावे आज कपिल सिब्बल यांनी खोडून काढले आहेत. तसेच, मूळ शिवसेना आम्हीच आहोत आणि शिवसेनेत जी काही फूट पडल्याचे बोलले जाते आहे. त्याचा पक्षावर काहीही परिणाम झालेला नाही. ही फूट मुळीच ग्राह्य धरू नये”, असेही कपिल सिब्बल यांनी म्हटले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होत आहे. राज्यातील सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटीच्या दृष्टीने ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे.

- Advertisement -

हेही वाचा – जेपी नड्डांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवला; लोकसभा निवडणुकीचं करणार नेतृत्व

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -