घरदेश-विदेशबॉम्ब बरेच, वातीही काढल्यायत, फक्त...; सीमावादावरून ठाकरेंचा शिंदे- फडणवीस सरकारला इशारा

बॉम्ब बरेच, वातीही काढल्यायत, फक्त…; सीमावादावरून ठाकरेंचा शिंदे- फडणवीस सरकारला इशारा

Subscribe

शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारविरोधात नागपूरात जाऊन मोठे बॉम्ब फोडणार असल्याचा सूचक इशारा दिला होता. यानंतर आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आमच्याकडे बरेच बॉम्ब आहेत. त्यांच्या वाती काढल्या आहेत, फक्त त्या वाती पेटवण्याचा अवकाश आहे, म्हणत सीमाप्रश्नावरून शिंदे फडणवीस सरकारला थेट इशारा दिला आहे. उद्धव ठाकरे आज नागपूर विधानसभा परिसरात माध्यमांशी बोलत होते.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, बॉम्ब बरेच आहेत. वाती काढल्या आहेत. फक्त त्या वाती पेटवण्याचा अवकाश आहे, मात्र मला वाटतं आधी ताबोडतोब सीमाभागातील काही लाख मराठी माणसांचं आयुष्य बरबाद होणं थांबवण्यासाठी ठराव केला पाहिजे. त्या भागातील मराठी माणसांनी निवडणुका जिंकून दाखवल्या आहेत, आंदोलनं केली आहेत.

- Advertisement -

विवादास्पद भाग केंद्रशासित झालाच पाहिजे, उद्धव ठाकरेंची आग्रहाची मागणी 

आता काहीजण म्हणतात की, तुम्ही कुठे लाठ्याकाठ्या खाल्ला आहेत. तुमच्या अंगावर कुठे केसेस आहेत, या गोष्टीला काहीही अर्थ नाही. कारण लाठ्याकाठ्या खाल्ल्या असं म्हणणारे तेव्हा आमच्यात होते. मात्र याचा अर्थ त्यांनी आता गप्प बसावं असा नाही, जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत हा विवादास्पद भाग केंद्रशासित झाला पाहिजे, अशी आमची आग्रहाची मागणी आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली, एवढाच काळ किंवा त्यापेक्षा जास्त काळ सीमाभागातील माणसं मराठीत बोलत आहेत. त्यांनी आंदोलनासह विविध मार्गांनी आम्हाला महाराष्ट्रात जायचं आहे असं मत व्यक्त केलं आहे, त्यांनी लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकून दाखवल्या आहेत. त्यावर ठरावही मान्य झाला आहे.

- Advertisement -

आज का उद्या ठराव आणायचं सांगत आहेत, पण आजपर्यंत किती ठराव आले. आत्तापर्यंत प्रत्येक वेळी पाहिलं असाल कधीही महाराष्ट्रात कानडी भाषिकांवर मराठी भाषेचा अत्याचार झालेला नाही. पण कर्नाटक, बेळगाव, निपाणी वैगरे जो परिसर आहे त्या भागात मराठी भाषिकांवर कानडी भाषेचा अत्याचार झालेला आहे. वीज बिल आणि आणखी काही असेल ते कानडी भाषेतून सुरु झालं आहे त्यानंतर तुम्ही माहिती घ्या की, सर्व व्यवहार जे कानडी भाषेत होतात तिथल्या मराठी भाषिकांना ती भाषा येतचं नाही आणि मग त्यांना कागदपत्रांवर अंगठे उमटवावे लागतात, असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला आहे.

तिथल्या एक, दोन जणांना अंगठे बहाद्दर म्हटले जाते. आम्ही याचा निषेध करतो मात्र कर्नाटक सरकार याला काहीही किंमत देत नाही. आम्हाला कर्नाटकची एक इंचही जागा नको आमची जी हक्काची जागा आहे तीच आम्ही मागत आहोत, त्या व्यतिरिक्त कर्नाटकची जागा नको, असही उद्धव ठाकरे म्हणाले.


कर्नाटकातील मराठी भाषिकांवरील अत्याचार रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुचवले ‘हे’ पर्याय

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -