Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र सत्तेची पोटदुखी झालेल्यांना राजकीय औषध देणार; उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

सत्तेची पोटदुखी झालेल्यांना राजकीय औषध देणार; उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

Related Story

- Advertisement -

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी राज्यातील तमाम शिवसैनिकांशी संवाद साधताना भाजपवर निशाणा साधला. भाजप सत्तेसाठी कासावीस झाला आहे. ज्यांना सत्तेची पोटदुखी झाली आहे. त्यांना मीच राजकीय औषध देणार आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

शिवसेनेचा आज ५५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. तसंच शिवसेनेची पुढील वाटचाल आणि भाजपबाबत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडेही संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्रिपदाची झूल बाजूला ठेवून मी आज बोलतोय. मी ५५ वर्षांच्या वाटचालीचं श्रेय ज्यांनी ज्यांनी शिवसेना जोपासली, वाढवली, त्या सर्व शिवसैनिकांना जाते. या सर्व शिवसैनिकांना माझं अभिवादन. माझ्या शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा, अशा शुभेच्छा देतानाच गेल्या दीड वर्षात आपलं काम बोलतंय. अनेकांच्या पोटात दुखतंय. सत्ता नाही म्हणून पोटात दुखतंय, ते त्यांचं त्यांनी पाहावं, त्यांना औषध मी नाही देणार. राजकीय औषध मी देईन, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

कुणाचीही पालखी वाहणार नाही

- Advertisement -

आम्ही कुणाचीही पालखी वाहणार नाही. सत्तेसाठी लाचार होणार नाही. शिवसेनेचा जन्म न्याय हक्क मिळवून देण्यासाठी झाला आहे. आम्ही भलत्यासलत्याच्या पालख्यांना खांदा देणार नाही. त्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला नाही. पायात फाटके जोडे घालू, पण आम्ही आमच्याच पायांवर खंबीरपणे उभे राहू, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

 

- Advertisement -