घरताज्या घडामोडीभाजप पाठोपाठ आता शिवसेनाही नवीन पक्ष कार्यालयात जाण्यास इच्छुक

भाजप पाठोपाठ आता शिवसेनाही नवीन पक्ष कार्यालयात जाण्यास इच्छुक

Subscribe

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी सुरु झाली लगबग

मागील अनेक वर्षांपासून नुतनीकरण केलेल्या शिवसेना, भाजप आणि राष्ट्वादी कार्यालयाच्या वास्तू उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु ही कार्यालय बंद पडल्याने त्यांना वाळवी लागून रंगही उडून गेला आहे. मात्र,भाजपने आपले कार्यालय नवीन वास्तूत नेण्याचा निर्णय घेवूनही केवळ वास्तूंमधील रंगरंगोटी, स्वच्छता आणि इतर कामांमुळे मुहूर्त पुढे ढकलला. भाजप आपल्या कार्यालयाचे उद्घघाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यापूर्वीच शिवसेनेने आपल्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते करून या वास्तूत प्रवेश करण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यामुळे भाजपपाठोपाठ शिवसेनेच्याही नवीन वास्तूत जाण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

महापालिका मुख्यालयातील नवीन इमारतीतील पहिल्या मजल्याच्या नुतनीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले. त्यानुसार पहिल्या मजल्यावर असलेल्या शिवसेना, भाजप आणि राष्ट्वादी काँग्रेस पक्षासाठी मागील दोन ते अडीच वर्षांपूर्वी कार्यालयांची बांधणी करण्यात आली. परंतु या कार्यालयात जाण्यासाठी शिवसेना आणि भाजप तसेच राष्ट्वादी काँग्रेस तयार नाही. या कार्यालयाच्या बांधणीसाठी महापालिकेची कार्यालये तिथून हटवण्यात आली. महापालिकेने आपली कार्यालये हटवून पक्ष कार्यालये बनवली असली तरी या कार्यालयांचा ताबा घेवूनही त्यांचा वापर न करता या पक्षांनी ती बंद ठेवली आहेत. त्यामुळे पर्यायाने महापालिकेचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

मात्र, काही दिवासांपूर्वी भाजपने २७ फेब्रुवारीला आपल्या कार्यालयाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करून वापर करण्याच्या दृष्टीकोनातून कार्यालयाची पाहणी केली. त्यावेळी नुतनीकरण केलेल्या कार्यालयात काही भागांमध्ये वाळवीसह अनेक भाग खराब झाल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी रंग उडून गेला. त्यामुळे ही सर्व दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत त्यांनी हा मुहूर्त मार्च महिन्यापर्यंत पुढे ढकलला.
मात्र, भाजप माजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपल्या कार्यालयाचे उद्घाटन करणार हे समजताच आता शिवसेनेनेही आपल्या नवीन जागेत जाण्याची तयारी केली आहे. त्या दृष्टीकोनातून शिवसेनेने आपल्या नवीन पक्ष कार्यालयाची साफसफाई करून घेतली असून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते याचे उद्घाटन करून कार्यालय प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची वेळ निश्चित होताच शिवसेनाही आता तळ मजल्यावरील नवीन कार्यालयात आपला मुक्काम हलवणार असल्याची बोलले जात आहे. दरम्यान, राष्ट्वादी काँग्रेसचेही नवीन कार्यालय तयार असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची वेळ मिळत नसल्याने नवीन कार्यालयातील मुक्काम लांबणीवर पडत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पक्ष कार्यालयाबरोबरच राष्ट्वादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाचा बार उडवून देण्याची रणनिती राष्ट्वादी काँग्रेसकडून आखली जात असल्याचे बोलले जात आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -