शिवसेना महिला आघाडीचा आक्रोश; अमृता फडणवीस यांच्या फोटोला मारले जोडे

shiv sena woman party workers slams on amruta fadnavis
शिवसेना महिला आघाडीचा आक्रोश; अमृता फडणवीस यांच्या फोटोला मारले जोडे

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून बोचरी टीका केली होती. याचे पडसाद अवघ्या महाराष्ट्र उमटत असून पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना महिला आघाडी यांनी अमृता फडणवीस यांच्या फलकावरील प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना महिला आघाडीने अमृता फडणवीस यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे आणि चप्पल मारून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल केलेल्या ट्विटचा निषेध केला. यावेळी अमृता फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आल्या.


हेही वाचा – मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळेना; ठाकरे सरकारला लागलं ग्रहण


काय आहे नेमकं प्रकरण?

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. ‘गांधी आडनाव असल्यानं कोणी गांधी होत नाही’ असं ट्विट फडणवीस यांनी केलं होतं. त्यानंतर आठ दिवसांनी अमृता यांनी देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट रिट्विट करत ठाकरे कुटुंबियांवर टीका केली. अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं की, ‘खरंय देवेंद्रजी, फक्त ‘ठाकरे’ आडनाव असून सुद्धा कोणी ‘ठाकरे’ होऊ शकत नाही. फक्त आपलं कुटुंब आणि सत्ता या पलिकडे जाऊन लोकांसाठी प्रमाणिकपणे काम करावं लागतं.’ त्यानंतर अमृता फडणवीस यांना शिवसैनिकांनी ट्विटरवरच जशाच तसे उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी-चिंचवड येथे शिवसेना महिला आघाडीने अमृता फडणवीस यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे आणि चप्पल मारून निषेध व्यक्त केला.