शिवसेनेच्या औरंगाबाद सभेचा टीझर प्रसिद्ध, औरंगाबाद नाही, संभाजीनगर…

Uddhav Thackeray criticizes BJP

औरंगाबाद शहरात 8 जूनला शिवसेनेची सभा होणार आहे. या सभेचा टीझर शिवसेनेने प्रसिद्ध केला आहे. औरंगाबाद नाही, संभाजीनगर, मी नाव दिले आहे. शिवसेनेने नाव दिले आहे. हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातील वक्तव्य टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे.

टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या जुन्या भाषणातील वक्तव्य –

शिवसेनेने जारी केलेल्या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या जुन्या भाषणातील वक्तव्याचा वापर करण्यात आला आहे. त्यामध्ये औरंगाबाद नाही, संभाजीनगर, मी नाव दिले आहे. शिवसेनेने नाव दिले आहे, असे बाळासाहेब ठाकरे म्हणताना दिसत आहेत. संभाजीनगर शिवसेना शाखेचा 37 वा वर्धापन दिन सोहळा असेही या टीझरमध्ये सांगितले आहे. देव…देश… आणि धर्म…हेच शिवसेनेचे मर्म असे वाक्य या टीझरमध्ये दिसत आहे.

उद्धव ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा –

औरंगाबादमद्ये 8 जूनला उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. शिवसेनेच्या मराठवाड्यातील पहिल्या शाखेच्या 37 व्या वर्धापन दिनानिमित्त ही सभा आयोजित करण्यात आली आहे. शिवसेनेची पहिली शाखा औरंगाबाद मध्ये 8 जून 1985 ला स्थापन करण्यात आली होती. या सभेला मराठवाड्यातून शिवसैनिक उफस्थित कराहणार असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.

राज ठाकरे आणि शिवसेनेला देणार उत्तर –

राज ठाकरे यांची सभा याच मैदानात झाली होती. त्यांनी यावेळी महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्याच मैदानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. राज यांच्या टीकेला आणि भाजपला उद्धव ठाकरे काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.