घरमहाराष्ट्रराज्यात सत्ता स्थापनेचा शिवसेनेचा दावा कायम

राज्यात सत्ता स्थापनेचा शिवसेनेचा दावा कायम

Subscribe

नियोजित वेळेत आम्हाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याचे पत्र मिळाले नाही. इतर दोन पक्षांच्या पाठिब्यासाठीच्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी आम्ही राज्यपालांकडे तीन दिवसांची वेळ मागितली. मात्र वेळ वाढवून देण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नकार दिला. मात्र आमचा दावा कायम असून सत्ता स्थापनेसाठी लवकरच अपेक्षित असलेले संख्याबळ आम्ही दाखवू असे युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितले. नियोजित वेळेत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचे पत्र दिले नसल्यामुळे आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांकडे तीन दिवसांची मुदत मागितली होती. मात्र मात्र ती देता येणार नाही, असे राजभवनातून जाहीर केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. राजभवनावर राज्यपालांना भेटून आल्यावर आदित्य ठाकरे यांनी तेथेच पत्रकार परिषदेत माहिती दिली.

ते म्हणाले की, काल संध्याकाळी भाजपने सरकार स्थापनेचा दावा नाकारल्यानंतर आम्हाला निमंत्रण देण्यात आले. आम्हाला साडेसात वाजण्याची वेळ देण्यात आली होती. आम्ही पावणेसात वाजताच राजभवनावर पोहोचलो होतो. सत्ता स्थापनेचा दावा आम्ही केला. आणि आमच्या पक्षाच्या आमदारांचे पत्र ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यपालांना सादर करण्यात आले.

- Advertisement -

यामुळे आम्ही सत्ता स्थापनेचा दावा पुन्हा करू आणि पाठिंब्यासह पुन्हा राज्यपालांना भेटू असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. आम्ही स्थीर सरकार देऊ शकतो, राज्यपाल काय निर्णय घ्यायचे ते घेतील. पण सत्ता स्थापन करण्याची आमची तयारी असल्याचेही आदित्य म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन पक्षांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे. पण दाव्यासाठी असलेल्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेला अवधी अपूर्ण होता. तो वाढवून मिळावा आणि किमान ४८ तास देण्यात यावे, अशी आम्ही मागणी केली. आमच्याच दाव्यासाठी २४ तास लागले. इतर पक्षांना वेळ लागणे स्वाभाविक असल्याचेही आदित्य म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -