Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी विकासाचे गुजरात मॉडेल ते हेच का? गुजरातच्या मुख्यमंत्री बदलावर शिवसेनेचे टीकास्त्र

विकासाचे गुजरात मॉडेल ते हेच का? गुजरातच्या मुख्यमंत्री बदलावर शिवसेनेचे टीकास्त्र

धक्के देणे व फार झोतात नसलेल्या लोकांच्या हाती सत्ता देणे हेच मोदी राजकारणाचे तंत्र - संजय राऊत

Related Story

- Advertisement -

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सोमवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यावरुन विरोधकांनी भाजपवर टीका केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री बदल्यानंतर आता मंत्रिमंडळ बदलण्याबाबतची जबाबदारी आता भूपेंद्र पटेल यांच्यावर आली आहे. तर आगामी निवडणूका जिंकून देणे ही जबाबदारीसुद्धा पटेल यांच्यावर सोपवण्यात आली आहे. भाजपने केलेल्या बदलांवर शिवसेनेकडून टीकास्त्र डागण्यात आलं आहे. गुजरात हे विकास आणि प्रगतीचं मॉडेल असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत होते. मग त्याच गुजरातमध्ये मुख्यमंत्री बदलल्यामुळे हेच विकासाचे गुजरात मॉडेल आहे का? असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

गुजरात मुख्यमंत्री बदलावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सामना अग्रलेखातून टीकास्त्र सोडलं आहे. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, गुजरात राज्य जर विकास, प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होते, तर मग अशा पद्धतीने रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली? कोठे काय बदलायचे हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. भाकरी ही फिरवावीच लागते , पण एखादे राज्य जेव्हा विकास किं वा प्रगतीचे ‘मॉडेल’ असल्याचे आदळआपट करीत सांगितले जाते , तेथे अचानक नेतृत्वबदल घडवला की, मग लोकांच्या मनात शंका निर्माण होतात असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. भूपेंद्र पटेल यांच्यावर आता गुजरातचा भार पडला आहे. वर्षभरात विधानसभांच्या निवडणुका आहेत. पटेल यांना पुढे करून नरेंद्र मोदी यांनाच लढावे लागणार आहे. गुजरात मॉडेल म्हणायचे ते हेच काय? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

फडणवीसांना मुख्यमंत्री करुन धक्का दिला

- Advertisement -

भाजपमध्ये शेवटच्या बाकावर बसणाऱ्या भूपेंद्र पटेलांना मुख्यमंत्री करण्याचे कारण काय? पण धक्के देणे व फार झोतात नसलेल्या लोकांच्या हाती सत्ता देणे हेच मोदी राजकारणाचे तंत्र आहे. गुजरातमध्ये तेच घडले. मोदी यांनी अनेकदा अचानक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. महाराष्ट्रातही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देऊन ‘धक्का’ दिला होता. आता गुजरातमध्येही त्याच ‘धक्कातंत्रा’चा वापर झाला आहे. नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा राजकीय प्रवास नगरसेवक ते मुख्यमंत्री असा आहे. पक्षनेतृत्वाने टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी त्यांना स्वतःला सिद्ध करावे लागेल. मावळते मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या काळात गुजरातमध्ये भाजप रसातळाला जात होती यामुळे गुजरातमध्ये मुख्यमंत्री बदलले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा :  ठाकरे सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक संवेदनशील, संजय राऊत यांचे वक्तव्य


- Advertisement -

 

- Advertisement -