घरताज्या घडामोडीशिवसेनेच्या विधिमंडळ कार्यालयाला कुलूप, कारण काय?

शिवसेनेच्या विधिमंडळ कार्यालयाला कुलूप, कारण काय?

Subscribe

शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या आदेशाने कार्यालय बंद ठेवण्यात आले आहे. पक्ष कार्यालयाच्या बाहेरच सूचना लिहिण्यात आली असून याबाबत आता उलटसुटल चर्चा रंगू लागल्या आहेत.

बंडखोर आमदारांचा (Rebel MLA) डाव यशस्वी झाल्यानंतर आज पहिल्यांदाच शिंदे गट आणि शिवसेना गट आमने-सामने येणार आहेत. नवं सरकार सत्ते आल्यानंतर विधिमंडळात महत्त्वाचे अधिवेशन बोलावण्यात आले असून यावेळी विधान सभेच्या अध्यक्षाचीही निवडणूक होणार आहे. दरम्यान, शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या आदेशाने कार्यालय बंद ठेवण्यात आले आहे. पक्ष कार्यालयाच्या बाहेरच सूचना लिहिण्यात आली असून याबाबत आता उलटसुटल चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी या बंद कार्यालायच्या कुलुपाची चावी आमच्याकडेच असल्याचं स्पष्ट सांगितलं. (Shiv Sena’s legislature office locked)

हेही वाचा – बंडखोर आमदारांना अतिरेक्यांसारखं आणलं, कसाबसाठीही एवढा बंदोबस्त नव्हता; आदित्य ठाकरेंचा खोचक टोला

- Advertisement -

शिंदे गटाकडे शिवसेनेतील दोन तृतीयांश आमदार आहेत. त्यामुळे शिंदे गटाने शिवसेनेवर दावा केला आहे. तर, दुसरीकडे बंडखोर आमदारांवर शिवसेनेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सेनेतील या अंतर्गत कलहामुळे विधिमंडळ कार्यालय बंद ठेवण्याची वेळ आली असून कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही बाहेर काढण्यात आलं आहे.

हेही वाचा – …तर, आपण राज्याचे मुख्यमंत्री असता; राऊतांचा फडणवीसांना टोला

- Advertisement -

दरम्यान, बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ३९ आमदारांसह ५० आमदारांसोबत हातमिळवणी करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. भाजप-शिवसेना यांच्या युतीतून हे सरकार सत्तेवर आलं असल्याचं शिंदे गटाकडून सांगण्यात येत असलं तरीही एकनाथ शिंदे हे सेनेचे मुख्यमंत्री नाहीत, अशी ठाम भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली होती. नवं सरकार सत्तेवर आल्यानंतर आज पहिल्यांदाच अधिवेशन होणार असून हे पहिलंच अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे.

तसेच, गेल्या  कित्येत महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्ष पदासाठी आज निवडणूक होणार आहे. शिवसेनेने यासाठी राजन साळवी यांना उमेदवारी दिली असून भाजपकडून राहुल नार्वेकर यांना पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत नक्की कोण जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -