Arind Sawant on Ekanth Shinde दिल्ली : उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं नाही. आमचं हिंदुत्व बावनकशी आहे. ढोंगी नाही. आम्हाला कुणाचाही फोन आलेला नाही. फोन आल्याच्या बातम्या खोट्या आहेत. 100 टक्के आम्ही कुठेच जाणार नाही, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभा खासदार अरविंद सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. (Shiv Sene Thackeray Group MP Arvind Sawant Press at delhi slams dcm eknath Shinde)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांच्या दिल्लीत निवासस्थानी ठाकरेंच्या खासदारांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद सावंतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला.
“आम्हाला कुणाचाही फोन आलेला नाही. फोन आल्याच्या बातम्या खोट्या आहेत. 100 टक्के आम्ही कुठेच जाणार नाही. पंतप्रधानांचा हिंदुत्वाचा मुद्दा कुठे आहे कळू द्या. बांगलादेशात काल हिंदूंवर हल्ला झाला. अमेरिकेत जे काही घडलं, आपल्या लोकांना बेड्या ठोकून देशात आणलं गेलं. इथे अमृतसरमध्ये अमेरिकेच्या मिलिट्रीचं विमान उतरतं हा देशाचा अपमान आहे. हे तिकडे डुबकी घेत आहेत. त्यांना हिंदुत्वाशी काही घेणंदेणं नाही. त्यांना फक्त सत्ता हवी आहे. काल अमेरिकेने देशाचा अपमान केला आहे. छोट्या देशांनी अमेरिकेला डोळे वटारून सांगितलं. आमचे विमान येईल आणि आमचे लोक घेऊन जाईल. पण तुम्हाला का सांगता आलं नाही”, असं म्हणत अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
“तुम्ही ट्रम्पचा हात मिळवून प्रचार केला होता. तेव्हा ट्रम्पचा पराभव झाला. तुम्हाला ट्रम्पच्या निमंत्रणाची वाट पाहावी लागली होती. झोंबतंय तुम्हाला. आमचे खासदार चिडले आहेत. मतदारसंघात आमच्याबद्दल नको त्या चर्चा होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं नाही. आमचं हिंदुत्व बावनकशी आहे. ढोंगी नाही. जो राष्ट्रासाठी प्राण देईल तो आमचा हिंदू आहे”, असेही अरविंद सावंत यांनी म्हटले.