Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र 'शिवाई' एसटीच्या ताफ्यात दाखल; नाशिक-पुणे मार्गावर धावणार ई-बस, 'या' आहेत सुविधा

‘शिवाई’ एसटीच्या ताफ्यात दाखल; नाशिक-पुणे मार्गावर धावणार ई-बस, ‘या’ आहेत सुविधा

Subscribe

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीची जागा आता नव्या गाड्यांनी घेण्यास सुरूवात केली आहे. महामंडळाच्या ताफ्यात आता इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. नाशिक विभागात नुकत्याच दोन नव्या इलेक्ट्रिक बस इ-शिवाई दाखल झाल्या असून नाशिक-पुणे मार्गावर या बस धावणार आहेत.

पर्यावरण संवर्धन करताना रस्त्यावर इलेक्ट्रीक वाहनांच्या संख्येत वाढ होते आहे. काळाची गरज ओळखून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ‘ई- शिवाई’ इलेक्ट्रिक बस अवगत केली आहे. सध्या महामंडळाच्या ताफ्यात ३०० हून अधिक बस आहेत. यात शिवशाहीचाही समावेश आहे. आता प्रवाश्यांच्या सेवेसाठी अत्याधुनिक सुविधांनीयुक्त अशी इ शिवाई ही इलेक्ट्रिक बस ताफ्यात दाखल झाली आहे. राज्यात औरंगाबाद, पुणे याठिकाणी ही बससेवा सुरू आहे. नाशिक येथील ठक्कर बझार (नवीन सीबीएस) स्थानकातून ‘ई- शिवाई’ बस पुण्यासाठी मार्गस्थ होईल.

- Advertisement -

बसमध्ये ४५ आसनांची व्यवस्था असून दोन जागांच्या गटासाठी युएसबी स्वतंत्र चार्जर, वाहन आरोग्य देखरेख उपकरण, इन्फोटेन्मेंट आदी व्यवस्था देण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत नाशिक विभागात दोन बस आल्या असून ही संख्या आठ ते नऊपर्यंत पोहचणार आहे. या बस नाशिक-पुणे अशा दिवसाला १८ फेर्‍या करणार आहेत. वाहनांची दुरूस्ती देखभाल, वाहनचालक ही व्यवस्था खासगी तत्वावर ठेकेदाराकडे देण्यात आली आहे. नाशिक विभागात दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बस चार्जिंग तपासणी करुन पुढील दोन दिवसात प्रवाश्यांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावतील. या संदर्भात आगारात चाचपणी सुरू आहे. शिवशाही बसच्या प्रवासी दरातच इ शिवाई ही बस सेवा सुरू राहणार आहे. प्रवाश्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

यामुळे ठरते शिवाई विशेष 

 • ऑनबोर्ड युनिट आणि बस ड्रायव्हर कन्सोल
 • एआयएस-१४० प्रमाणित वाहन ट्रॅकिंग प्रणाली
 • पॅनिक बटण सुविधा
 • प्रवासी घोषणा प्रणाली आणि ण्ड्रॉईड टिव्ही
 • प्रगत ड्रायव्हिंग असिस्टंट सिस्टम, ड्रायव्हर स्टेट्स मॉनिटरिंग सिस्टम.
 • पीआयएस डिस्प्ले बोर्ड
 • हवा गुणवत्ता फिल्टर
 • चालकाच्या केबिनमध्ये तापमान, आर्द्रता, हवा गुणवत्ता सेन्सर
 • रिअल- टाइम कनेक्ट केलेले अल्कोहोल सेन्सर
 • सस्पेंशन सेन्सर लोड
 • प्रत्येक प्रवासी आसनासाठी लोड सेन्सर (प्रवासी मोजणी)
 • टायर प्रेशर मॉनिटरिंग सेन्सर
 • दोन जागांच्या गटासाठी यूएसबी स्वतंत्र चार्जर
 • वाहन आरोग्य देखरेख उपकरण
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -