घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रबाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळेंना ‘ईडी’च्या नावे धमकी

बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळेंना ‘ईडी’च्या नावे धमकी

Subscribe

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांना सक्तवसुली संचनालय (ईडी)च्या नावाने धमकी आली असून, याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन नाशिक शहर गुन्हे शाखा व अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे चुंभळे यांनी सांगितले.

शिवाजी चुभळे हे नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चेतील नाव आहे. बाजार समितीतील सत्ताकारणावरून ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. ईडी ऑफिसमधून अधिकारी बोलत असल्याचे सांगत संबंधिताने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे सोबत असून, त्यांच्याकडे तुमच्याविषयी तक्रार आल्याचे चुंभळे यांना सांगितले. यासंदर्भात चुंभळे हे कायदेशीर सल्ला घेऊन लवकरच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे समजते. यापूर्वीही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका पदाधिकार्‍याला ईडीच्या नावाने कॉल आल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यावेळी तपासात काहीही निष्पन्न झाले नव्हते. हा प्रकार तसाच असल्याची शंका व्यक्त होत असली तरी याविषयी शहानिशा होणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

मंगळवारी (दि.१३) मोबाईलवर कॉल आला. मी ’ईडी ’ कार्यालयातून बोलतो आहे. आपल्याबाबत आमच्याकडे तक्रार आली आहे. त्यासंदर्भात कारवाई केली जाणार आहे. कारवाईपूर्वी ताबडतोब आमची भेट घ्यावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा धमकीवजा इशारा दिला आहे. यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन गुन्हा दाखल करणार आहे. ज्या क्रमांकावरुन फोन आला त्याची पडताळणी केली असता तो मनदीपसिंग आहुलिया यांच्या नावावर असल्याचे दिसून येते.
शिवाजी चुंबळे, माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती,नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -