पावनखिंडवर दारू पिऊन धिंगाणा, शिवभक्तांनी दिला चोप; व्हिडीओ व्हायरल

हजारो शिवप्रेमी विशाळगड आणि पावनखिंडला भेट देण्यासाठी येत असतात. काही पर्यटक सुद्धा पावनखिंडला भेट देण्यासाठी गेले होते. मात्र, पावनखिंडला गेलेल्या काही पर्याटकांमधील तरूणांनी दारू पिऊन धिंगाणा घातला. मात्र, हे निदर्शनास येताच शिवभक्तांनी त्यांना चांगलाच चोप दिला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पावनखिंडमध्ये शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या पाऊलखुणा आहेत. सिद्धीच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी पावनखिंडीतून शिवराय विशाळगडावर पोहोचले होते यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद यांच्यासारख्या अनेक मावळ्यांनी बलिदान दिल्याने पावनखिंडीत प्रत्येक वर्षी रणसंग्राम दिवस साजरा केला जातो. मात्र, काही पर्यटकांनी मद्यपान करून या पवित्र स्थळाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवभक्तांनी त्यांना चांगलाच चोप दिला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्याा व्हिडिओत शिवभक्तांनी त्यांची चांगलीच धुलाई केली. काही शिवभक्त लाथाबुक्यांनी मद्यपींना मारत असल्याचे स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

वीर बजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या भूमिला पावनखिंड असे नाव देण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा आणि विशाळगडावर असे वारंवार प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे. काल झालेल्या घटनेत मद्यपींना कान पकडून माफी मागावी लागली. त्यानंतर हे प्रकरण शांत झाले.


हेही वाचा : उगाच तोंड उघडायला लावू नका; मिटकरींचा केसरकरांना इशारा