घरमहाराष्ट्रछत्रपती शिवाजी महाराज कुणबी समाजाचे; नाना पटोले यांच्या वक्तव्याने नवा वाद

छत्रपती शिवाजी महाराज कुणबी समाजाचे; नाना पटोले यांच्या वक्तव्याने नवा वाद

Subscribe

पटोले म्हणाले, शिवाजी महाराज हे कुणबी समाजाचे होते. राज्य व नेतृत्व कसे असावे याची दिशा महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला शिवाजी महाराजांनी दिली. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मी काम करत आहे. कुणबी समाजात माझ्यापेक्षा अनेक मोठे नेते आहेत. प्रत्येकजण समाजाचे देणे लागतो. त्यानुसार प्रत्येकाने काम करायला हवे. मीही माझे काम त्याचपद्धतीने करत आहे.

अकोला: छत्रपती शिवाजी महाराज हे कुणबी समाजाचे होते, असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी केले. अकोल्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.

पटोले म्हणाले, शिवाजी महाराज हे कुणबी समाजाचे होते. राज्य व नेतृत्व कसे असावे याची दिशा महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला शिवाजी महाराजांनी दिली. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मी काम करत आहे. कुणबी समाजात माझ्यापेक्षा अनेक मोठे नेते आहेत. प्रत्येकजण समाजाचे देणे लागतो. त्यानुसार प्रत्येकाने काम करायला हवे. मीही माझे काम त्याचपद्धतीने करत आहे.

- Advertisement -

पुढे ते म्हणाले, शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये. ज्यांच्यामुळे आत्महत्या करूशी वाटते. त्यांनाच शेतकऱ्यांनी आत्महत्या करायला प्रवृत्त करायला हवे. तसेच प्रत्येक समाजाचे नेतृत्त्व ही काळाची गरज आहे. प्रत्येक समाजाला आपले नेतृत्त्व व्हावे असे वाटतं असते, असे पटोले म्हणाले.

समृद्धी महामार्गाच्या उद्घटनासाठी महाराष्ट्रात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावरही नाना पटोले यांनी टीका केली. ते म्हणाले, मोदी यांच्या दौऱ्याने कोणालाच लाभ झाला नाही. निराशाच झाली आहे. नागरिकांना त्रास झाला आहे. समृद्धी महामार्गामुळे काही नेते व अधिकाऱ्यांचीच समृद्धी झाली आहे. त्याचे पुरावे लवकरच बाहेर काढू, असा इशारा पटोले यांनी दिला.

- Advertisement -

पटोले यांनी शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी शरद पवार व नितीन गडकरी यांची तुलना केली. आमदार प्रसाद लाड यांनी शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणातला असल्याचे वक्तव्य केले. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. त्यासाठी १७ डिसेंबरला मुंबईत महाविकास आघाडीचा मोर्चाही आहे. मात्र महापुरुषांचा अवमान स्वप्नातही विचार करु शकत नाही, असे पत्र राज्यपाल कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लिहिले आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फुले, आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केले. त्याबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली. त्यानंतर त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. अशा प्रकारे महापुरुषांबाबत वादग्रस्त विधाने राजकीय नेत्यांकडून केली जात असून त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -