शिवाजी महाराजांची तलवारच भाजपाचं मुंडकं छाटेल, संजय राऊतांचा संताप

भारतीय जनता पक्षाने इतिहास संशोधन मंडळाची नव्याने स्थापन केली आहे. जसं मुख्यमंत्र्यांनी नवा नीती आयोग स्थापन करून त्यावर स्वतःच्या मर्जीतील बिल्डर बसवले. त्याप्रमाणे भाजपाने इतिहास मंडळाची स्थापना करून आपली माणसं बसवली आहेत का? असा प्रश्नही राऊतांनी यावेळी उपस्थित केला.

Shiv sena mp sanjay raut demands cm eknath shinde devendra fadnavis to resign over bhagat singh koshyari statement

मुंबई – भाजपाच्या विविध नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शक्तीच यांना खतम करेल. शिवाजी महाराजांची तलवारच यांच्या पक्षाचं मुंडकं छाटणार आहे, असं संजय राऊत म्हणाले. आज माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी भाजपावर निशाणा साधला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी एका कार्यक्रमात केलं. त्यावरून राज्यात हलकल्लोळ माजला आहे. यावरून संजय राऊत यांना पत्रकारांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, कोण प्रसाद लाड? तो काय दत्तू वामन पोतदार आहेत का? रोज भाजापाचा एक नेता उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतो. ते इतिहासतज्ज्ञ आहेत का? भारतीय जनता पक्षाचं डोकं फिरलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शक्तीच यांना खतम करेल. शिवाजी महाराजांची तलवारच यांच्या पक्षाचं मुंडकं छाटणार आहे. यांच्या स्वप्नात अफझलखान आणि औरंगजेब येतो आणि यांच्या कानात काहीतरी बोलतो म्हणून हे नेते असं बोलतात. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायची यांची लायकी आहे का?असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.

भारतीय जनता पक्षाने इतिहास संशोधन मंडळाची नव्याने स्थापन केली आहे. जसं मुख्यमंत्र्यांनी नवा नीती आयोग स्थापन करून त्यावर स्वतःच्या मर्जीतील बिल्डर बसवले. त्याप्रमाणे भाजपाने इतिहास मंडळाची स्थापना करून आपली माणसं बसवली आहेत का? असा प्रश्नही राऊतांनी यावेळी उपस्थित केला.

कर्नाटकच्या आरेला कारे उत्तर देऊ असं सरकार म्हणाले. पण आरेवाल्यांनो आणि कारेवाल्यांनो कर्नाटक घुसलं आहे महाराष्ट्रात. नागपूरमध्ये पोस्टर चिटकवलं आहे. कुठे आहे महाराष्ट्र तुमचा. चुल्लूभर पाण्यात डुब जाओ, अशी तुमच्यावर वेळ आली आहे. आरेला कारे करण्याची जबाबदारी आता विरोधी पक्षावर आहे. तुम्हाला उद्यापर्यंत समजेल, विरोधी पक्ष काय करू शकतो ते.