घरमहाराष्ट्रपुणेशिवाजी विद्यापीठाला यूजीसीच्या कॅटेगरी वनचा दर्जा, ऑनलाईन अभ्यासक्रम राबवता येणार

शिवाजी विद्यापीठाला यूजीसीच्या कॅटेगरी वनचा दर्जा, ऑनलाईन अभ्यासक्रम राबवता येणार

Subscribe

कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून कॅटेगरी-वन दर्जा बहाल केला आहे. यामुळे ऑनलाईन अभ्यासक्रम राबवण्यास विद्यापीठ पात्र ठरले आहे. राज्यात केवळ सावित्रीबाई फुले विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ या कॅटेगरीमध्ये दाखल झाले आहे.

विद्यापीठाला नॅकच्या 3.52 सीजीपीए गुणांकनासह ‘ए-प्लस प्लस’ मानांकन मिळाले आहे. त्यामुळे युजीसीकडून विद्यापीठाला ‘कॅटेगरी-वन’ दर्जा प्रदान करण्यात आला आहे. यामुळे युजीसीच्या अनेकविधा सोयीसुविधा विद्यापीठाला प्राप्त होणार आहेत.

- Advertisement -

दूरशिक्षण केंद्राला 5 वर्षांसाठी मान्यता –

दूरशिक्षण केंद्राला युजीसीकडून 5 वर्षांसाठी मान्यता मिळाली आहे. यापूर्वी दरवर्षी ही प्रक्रिया करावी लागत असे. विद्यापीठाला स्वतःचे संचलित महाविद्यालय चालवण्याचा निर्णय घेतल्यास त्यासही मान्यता मिळू शकते, असे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

अशी आहे विद्यापीठांची कॅटेगरी –

युजीसीने विद्यापीठांना श्रेणीबद्ध स्वायत्तता देण्याचा निर्णय 2018 मध्ये घेतला. त्यानुसार ‘नॅक’ (बंगळुरू) यांचे 3.51 सीजीपीए गुणांकन आणि त्यावरील गुणांकनप्राप्त विद्यापीठांसाठी ‘कॅटेगरी-1’, 3.26 ते 3.50 या दरम्यान गुणांकनप्राप्त विद्यापीठे ‘कॅटेगरी-2’ आणि त्याव्यतिरिक्त सर्व विद्यापीठे ‘कॅटेगरी-3’ अशी ही श्रेणीरचना करण्यात आली आहे.

मिळणार सोयींचा लाभ  –

कॅटेगरी वन मध्ये शिवाजी विद्यापीठाचा समावेश झाल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मिळणाऱ्या अनेक सोयी सुविधांचा लाभ आता घेता येणार आहे. विद्यापीठ आता प्रगतीपथावर असून कन्टेन्ट विकसित करण्याचे काम सुरु आहे. येणाऱ्या काळामध्ये याचा लाभ विद्यापीठासह पर्यायाने विद्यार्थ्यांना होईल, असे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी सांगितले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -