घरताज्या घडामोडी... त्याचंच फळ मला मिळालं, हकालपट्टीच्या बातमीवरून आढाळराव नाराज

… त्याचंच फळ मला मिळालं, हकालपट्टीच्या बातमीवरून आढाळराव नाराज

Subscribe

या वृत्तामुळे राज्यभर आपली बदनामी झाल्याने आता विचारपूर्वक निर्णय घेऊ असं, शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.

शिवसेनेचे उपनेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त शिवसेनेचे मुखपत्र सामना वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई झाल्याची त्या वृत्तात म्हटले होते.  तसेच ही माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध पत्रकाद्वारे देण्यात आल्याचेही नमुद करण्यात आले होते. मात्र आता हे वृत्त अनावधानाने प्रसिद्ध झाल्याचं शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने दिली आहे. मात्र, या वृत्तामुळे राज्यभर आपली बदनामी झाल्याने आता विचारपूर्वक निर्णय घेऊ असं, शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते. (Shivajirao Adhalrao Patil Angry on shivsena leader Udddhav Thackeray)

सविस्तर वाचा – शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी नाही; पक्षाचं स्पष्टीकरण

- Advertisement -

माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले की, ‘सामनातील वृत्त वाचून अनेकांनी मला फोन केले. सुरुवातील मला वाटलं माझी मस्करी सुरू आहे. मला विश्वासच बसेना. पण नंतर मी सामना वाचला आणि मला धक्काच बसला. काल रात्रीच माझं  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणं झालं. मतदारसंघातले ५० कार्यकर्ते तुम्हाला उद्या भेटायला येतील, असं मी त्यांना फोनवर सांगितलं.’

ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना अभिनंदन केल्याचं पोस्टविषयी मला उद्धव ठाकरेंनी विचारलं. त्याबद्दल त्यांना नाराजीही व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करण्यात काहीच गैर नसल्याचं मी त्यांना सांगितलं. त्यावर जे झालं ते झालं, असं म्हणून ठाकरेंनी विषय वाढवला नाही. शिवाजीराव आढळराव पाटील पक्ष सोडून जाणार. राष्ट्रवादी, भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा अनेकदा झाल्या. मात्र तुम्ही पक्ष सोडून गेला नाहीत याचं कौतुक वाटतं, असंही ठाकरेंनी मला म्हटलं. तुम्ही जाणार अशी चर्चा असतानाही तुम्ही कधी गेला नाहीत आणि जे कधीही जाणार नाहीत अशी खात्री वाटत होती ते मात्र सोडून गेले, असं ठाकरे म्हणाल्याचंही पाटील यांनी सांगितलं.

- Advertisement -

हेही वाचा – समाजवादी पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर

प्रसिद्धी माध्यमांसमोर त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ते पुढे म्हणाले की, शिरुर लोकसभा मतदारसंघात गेली १८ वर्षे मी एकटाच राष्ट्रवादीविरोधात लढत आहे. २०१९ च्या निवडणुकीत पराभूत झालो. पण तरीही मी गावागावांमध्ये फिरतो. कोणताही निधी, पाठिंबा नसताना पक्ष जिवंत ठेवण्याचं काम सुरू ठेवलं. त्याचंच फळ मला हकालपट्टीच्या बातमीमधून पक्षानं दिलं असावं.

ते पुढे म्हणाले की, पवारांनी २००९ मध्ये मला राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली. शिरुर मतदारसंघातून लढू नका. तुम्हाला राज्यसभेची २ टर्म खासदारकी देतो, अशी ऑफर देऊनही मी राष्ट्रवादीत गेलो नाही. बाळासाहेबांशी प्रतारणा केली नाही. दोन दिवस विचार करेन आणि पुढचं काय ते ठरवेन, असं पाटील यांनी म्हटलं.

 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -