शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी नाही; पक्षाचं स्पष्टीकरण

चानक आढळरावांनी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करताना पक्षविरोधी कारवायी केल्याचा ठपका ठेवत आता त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे

shivajirao adhalrao patil expelled from shiv sena uddhav thackeray blamed for anti party activities

शिवसेनेचे उपनेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त सामना वृत्तपत्राच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झाले होते.. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्याविरोधात ही कारवाई झाल्याची त्या वृत्तात म्हटले होते.  तसेच ही माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध पत्रकाद्वारे देण्यात आल्याचेही नमुद करण्यात आले होते. मात्र  मात्र आता हे वृत्त अनावधानाने प्रसिद्ध झाल्याचं शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने दिली आहे.

शिवेसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. अखेर भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु होता. यावेळी शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या होत्या. गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ अशा आशयाचे पोस्टर शेअर केले होते. या पोस्टरमध्ये कुठेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो नव्हता. यामुळे आढळरावांनी पक्षविरोधी कारवायी केल्याचा ठपका ठेवत आता त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी सर्वत्र व्हायरल होत होती. मात्र अशा कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे. तसेच माजी आमदार शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेतच असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. (shivajirao adhalrao patil expelled from shiv sena uddhav thackeray blamed for anti party activities)

शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेतील ज्येष्ठ अनुभवी नेते आहेत. पुणे जिल्ह्यात शिवसेना पोहचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. २००४ मध्ये त्यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचा विजय मिळवून दिला. त्यानंतर २००९ आणि २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीतही त्यांना विजय मिळाला, गेली १५ वर्षे ते शिवसेनेसाठी शिरुर लोकसभा मतदारसंघात काम करत आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघातील खासदार आणि संसदेतील कामगिरीबाबत त्यांचा संसदरत्न पुरस्कार देखील गौरव करण्यात आला आहे. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभिनेते अमोल कोल्हे यांच्यासमोर आढळराव पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव आढळराव पाटीलांसाठी आणि शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला गेला.

दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील अलीकडे सलग तीन वेळा खासदार राहिलेले शिवसेनेचे फायरब्रँड नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे भविष्यात संसदेत असतील असा एल्गार केला होता, ते शिरुर लोकसभा मतदारसंघात गेले होते. त्यावेळी आढळरावांचं शिवसेनेसाठीचं काम मोठं आहे. त्यांच्या पाठीमागे उद्धव ठाकरे खंबीरपणे उभे आहेत. त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल, असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला होता. मात्र अचानक आढळरावांनी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करताना पक्षविरोधी कारवायी केल्याचा ठपका ठेवत आता त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.


Live Update : आजपासून शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं दोन दिवशीय अधिवेशन