घरमहाराष्ट्रशिवप्रतापदिनी उदयनराजे प्रतापगडावर अनुपस्थित; खंत व्यक्त करत म्हणाले...

शिवप्रतापदिनी उदयनराजे प्रतापगडावर अनुपस्थित; खंत व्यक्त करत म्हणाले…

Subscribe

आज शिवप्रताप दिन आहे त्यानिमित्तानेच प्रताप गडावर कार्यक्रम आयोजित कारण्यात आला होता.

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत असतात. कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले आणि त्या नंतर राजकीय वर्तुळातूसह इतर क्षेत्रातूनही मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. दरम्यान प्रवक्त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपकडून शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याचे नाकारण्यात आले होते. याच संदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली, प्रतिक्रिया देताना उदयनराजे भोसले भावुक झाले.

आज शिवप्रताप दिन आहे त्यानिमित्तानेच प्रताप गडावर कार्यक्रम आयोजित कारण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. पण यावेळी खासदार उदयनराजे भोसले गैरहजर होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात याची चर्चा तर झालीच पण नाराजीही पसरली. अशातच एका कार्यक्रमात बोलत असताना शिवरायांचा अवमान पाहण्यापेक्षा मेलो असतो तर चालले असते असे म्हणत उदयन राजे यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर खंत व्यक्त केली आहे.

- Advertisement -

एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी उदयनराजे म्हणाले की,”आमच्या व्यथा मांडायच्या तर कोणाकडे मांडायच्या असं कोण येवढ मोठं आहे की, ज्याच्या समोर जाऊन सांगू शकतो, याच संदर्भांत उदयनराजे पुढे म्हणाले शिवाजी महाराजांचा अपमान म्हणजे फक्त आमच्या घराण्याचा अपमान नाही, शिवाजी महाराज सर्वांचे होते त्यामुळे हा सर्वांचाच अपमान आहे. देशाला एकत्र ठेवण्याचा विचार ज्या शिवाजी महाराजांनी दिला त्यांचीच तुम्ही थट्टा, अपमान करता, जर त्यांच्या विचाराचा विसर पडला तर देशाची काय अवस्था होईल” असा प्रश्नसुद्धा उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.


हे ही वाचा – सोलापुरातील २८ गावांचा कर्नाटकात सामील होण्याचा निर्णय, बोम्मईंना पाठवला फॅक्स?

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -