घरताज्या घडामोडी'महाभारतातील जिहाद'वरून गदारोळ, शिवराज पाटलांचं स्पष्टीकरण

‘महाभारतातील जिहाद’वरून गदारोळ, शिवराज पाटलांचं स्पष्टीकरण

Subscribe

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी भगवद्गीतेची तुलना जिहादसोबत केल्याचा दावा केल्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. परंतु या वक्तव्यावर शिवराज पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विरोधक वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

चांगल्या गोष्टींच्या संरक्षणासाठी केलेल्या एखाद्या कृतीला जिहाद म्हणता येणार नाही. महाभारतात दुर्योधनाने जे कृत्य केले त्याला जिहाद असे म्हणू शकता. श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धापासून पळ न काढता त्याला सामोरे जाण्यास सांगितले. हा जिहाद नव्हता. लढाई, युद्ध सगळ्याच देशांमध्ये, धार्मिक ग्रंथात असल्याचे पाटलांनी म्हटले आहे.

- Advertisement -

शिवराज पाटील जिहादबाबत बोलताना म्हणाले की, तुम्ही कुराण वाचले का? कुराणानुसार, देव एक आहे. त्याला रंगरुप, आकार नाही. ज्यू आणि ख्रिश्चनांमध्येदेखील असेच म्हटले जाते. हिंदूच्या जुन्या ग्रंथातही याबाबत नमूद करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

पाटील यांनी गुरुवारी केलेल्या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली. त्यावर पाटील म्हणाले की, सरसंघचालक मोहन भागवत हे सुद्धा माझ्या या विधानावर अद्याप बोलले नाहीत. ते बोलतील असं वाटत नाही. मला काय म्हणायचे आहे, ते आधी समजून घेतील.

- Advertisement -

हेही वाचा : शिंदे- फडणवीस सरकारचा मविआला धक्का; CBI चौकशीसाठी राज्य सरकारची परवानगीची गरज नाही


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -