घरमहाराष्ट्ररायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी हजारो शिवभक्तांची उपस्थिती

रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी हजारो शिवभक्तांची उपस्थिती

Subscribe

असंख्य शिवभक्त किल्ले रायगडावर रयतेच्या राजाला मानाचा मुजरा करण्यासाठी दाखल

महाराष्ट्राचे एकमेव आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यास आज ६ जून रोजी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर हजारो शिवभक्तांनी गर्दी करत रयतेच्या राजाच्या शिवराज्यभिषेक सोहळ्यास उपस्थिती दर्शवली आहे. या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधत शिवभक्त किल्ले रायगडावर महाराजांना मानाचा मुजरा करण्यास दाखल होत असतात. शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी ६ जून रोजी मोठ्या उत्साहात तसेच जल्लोषात पार पडत असतो. आजही दिवसभरात साधारण दोन लाखांहून अधिक शिवभक्त किल्ले रायगडावर येतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा : आजचा दिनविशेष – शिवराज्याभिषेक सोहळा

- Advertisement -

जयघोषाने रायगड दुमदुमला

आज अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने येथे गुरुवारी ३४५वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा होत आहे. दोन दिवस असणाऱ्या या सोहळ्याची सुरूवात बुधवारी संध्याकाळी गडपूजन आणि जागर शिवकालीन युद्धकलेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला असून शत्रास्त्रे प्रात्याक्षिक, मर्दानी खेळ, शाहीरीच्या कार्यक्रमाने गडावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसले. गडावर असणाऱ्या विविध पुरातन वास्तू फुलांनी सजवल्या आहेत. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर शिवमय झाल्याचे दिसते.

- Advertisement -

विदेशातील राजदूतांची सोहळ्यास उपस्थिती

यंदा प्रथमच रायगडावर विदेशातील राजदूत देखील शिवराज्यभिषेक सोहळा पहाण्यासाठी उपस्थित राहणार असून पहाटेच उदयनराजे भोसले यांनी रायगडावरील राज सदरेमधील मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह होळीच्या माळावरील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. तर युवराज संभाजीराजे छत्रपती राज सदरेत महाराजांच्या पुतळ्यावर अभिषेक करणार आहेत.

या शिवराज्याभिषेक सोहळ्यात अभिषेक करण्याचा मान दुष्काळग्रस्त गावातील शेतकऱ्यांना देण्यात येणार असून या रयतेच्या राजाला रयतेकडून मानाचा मुजरा करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव राजकीय फायद्यासाठी घेवू नये

राज्यात सुराज्य निर्माण व्हावे, ही छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना होती. मात्र सध्या राज्यात दुष्काळ पडला आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव नाही, शेतकरी कर्जात डुबल्याने आत्महत्या करत आहे. अशावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव केवळ राजकीय फायद्यासाठी घेतले जावू नये.
संभाजीराजे भोसले, खासदार

…नाहीतर १८५७ चा बंड होईल

तर यावेळी शिवराजधानी किल्ले रायगडावर आलेले सातारचे खासदार श्रीमंत उदयनराजे यांनी मनोगत व्यक्त केले. सरकार म्हणत माझ्या ताब्यात आरबीआय, सीबीआय, निवडणूक आयोग आहे. या सगळया संस्थेतील लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे आपण लोकांच्या हिताचे करत आहोत की नाही. नाहीतर १८५७ मध्ये जसा बंड झाला तसा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही.
उदयनराजे भोसले, खासदार

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -