किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा; शिवप्रेमींसाठी विशेष सुविधा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या (chhatrapati shivaji maharaj) राज्याभिषेक सोहळ्यासाठी (shivrajyabhishek sohala) किल्ले रायगडावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज्यभरातून शिवप्रेमी या गडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत

छत्रपती शिवाजी महाराजांच्या (chhatrapati shivaji maharaj) राज्याभिषेक सोहळ्यासाठी (shivrajyabhishek sohala) किल्ले रायगडावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज्यभरातून शिवप्रेमी या गडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत. शिवराज्याभिषेक सोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने महाराष्ट्र पोलिसांकडून (Maharashtra Police) काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

या सुचनांच्या जनजागृतीसाठी पोलिसांनी एक व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडीओमध्ये (VIDEO) वाहतूक व्यवस्था आणि किल्ले रायगडाकडे (Raigad Fort) येणाऱ्या शिवप्रेमींच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था कुठे करण्यात आली आहे आणि इतर सुविधांबाबत माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा – चलो रायगड! राज्यसभा निवडणुकीतून माघारी परतलेले संभाजीराजे उद्या कोणती भूमिका जाहीर करणार?

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने युवराज संभाजीराजे व शहाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवराज्याभिषेक दिन सोहळा पार पडणार आहे. तसेच, सोमवार ६ जून रोजी रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला येणाऱ्या शिवप्रेमींची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आजच्या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती QR कोडच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

यामध्ये कार्यक्रमाची रुपरेषा, गडावर जाण्याचे व उतरण्याचे प्रमुख मार्ग, राहण्याची सोय, वैद्यकीय सेवा, अन्नछत्र, स्वच्छतागृहे, महिलांसाठी करण्यात आलेली स्वतंत्र व्यवस्था, गडाच्या पायथ्याला असलेली वाहनतळे, पायथ्याचे अन्नछत्र याची सर्व माहिती व नकाशे QR कोडच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

हेही वाचा – मी सत्य तेच बोललो, वडिलांचा आदर करतो, संभाजीराजेंचे ट्विटमधून प्रत्युत्तर

शिवप्रमेसांठी करण्यात आलेली सुविधा

 • शिवप्रेमींसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आली आहे.
 • गडावर व पायथ्याशी ३५ ठिकाणी पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्या असून गंगासागर तलावासह ४ ठिकाणी आरओ वॉटर सुविधा उपलब्ध.
 • गडाच्या पायथ्याला, पाचाड व कोंझर येथे वाहने पार्किंग सुविधा केलेली आहे.
 • वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहने पाच ते सात किमी दूर उभी केली जाणार. मात्र येथून शिवप्रेमींना ये-जा करण्यासाठी खास बस सुविधा मोफत ठेवण्यात आल्या आहेत.
 • गडावर हॅलोजन व इतर वीजपुरवठा सेवा सज्ज आहे.
 • सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत विभागाने आवश्यक ती तयारी केली आहे.
 • रायगडावर ये-जा करताना कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तातडीने मदतकार्य मिळावे यासाठी विविध रेस्क्यू टिम व ट्रेकर्स तैनात करण्यात आले आहेत.
 • ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
 • यंदाच्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची तसेच ‘जागर शिवशाहिरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा’ व ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ हे कार्यक्रम आकर्षण ठरणार आहेत.
 • राजसदरेवर होणाऱ्या या कार्यक्रमांसाठी मेघडंबरीसमोर शिवप्रमींना बसण्यासाठी व हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या मंडपाची सोय करण्यात आली आहे.
 • महसूल,पोलीस,सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, अग्निशमन अशा विविध शासकीय यंत्रणांसह अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, विविध संस्था, रेस्क्यू टीम, ट्रेकर्स हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सज्ज.

हेही वाचा – …तर निसर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा