घरताज्या घडामोडीबाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दुग्धाभिषेकानं शुद्धीकरण, नारायण राणेंनी घेतलं होतं दर्शन

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दुग्धाभिषेकानं शुद्धीकरण, नारायण राणेंनी घेतलं होतं दर्शन

Subscribe

शिवसैनिकांची भावना पहिलीच चुकीची असती तर त्यांना दर्शन घेऊन दिलं नसते - किशोरी पेडणेकर

केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेऊन आपल्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. राणेंनी स्मृतीस्थळाचं दर्शन घेऊन जन आशीर्वाद यात्रेला धडाक्यात सुरुवात केली असून परळमध्ये नागरिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. शिवसैनिकांनी आता बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दुग्धाभिषेकानं शुद्धीकरण केलं आहे. तसेच स्मृतीस्थळाच्या परिसरात गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं आहे. शिवसैनिकांनी केलेल्या शुद्धीकरणावरुन राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं होते. त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. नारायण राणे हे माजी शिवसैनिक आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या सहवासात नारायण राणेंनी राज्यकारभार केला आहे. यामुळे राणेंनी आपल्या जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेऊन केलं आहे.

- Advertisement -

विनायक राऊतांनी दिलं होतं आव्हान

नारायण राणें सारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही. राणें सारखा बाटगा आणि बाळासाहेबांशी बेईमान महाराष्टात दूसरा नेता नाही. त्यामुळे अश्या घरफोड्याला शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी भेट घेऊ देणार नाहीत असा इशारा खासदार विनायक राऊत यानी दिला आहे.

…तर दर्शन घेऊन दिलं नसतं

शिवसैनिकांची भावना पहिलीच चुकीची असती तर त्यांना दर्शन घेऊन दिलं नसते. परंतु शिवसेनेच्या प्रमुखांना नतमस्तक व्हायचे आणि त्यांच्या मुलाची मुख्यमंत्री असताना वाईट शब्दात निंदा करायची तर कुठला सैनिक सहन करणार नाही. जर मुख्यमंत्र्यांना नारायण राणे यांनी येऊच नये असे वाटलं असतं तर त्यांना येऊन दिलं नस्ते. पण त्यांनी तसे केलं नाही. कारण नारायण राणे हे माजी शिवसैनिक आहेत. दर्शन घेतल्यानंतर शिवसेना प्रमुखांना अशा पद्धतीने बोलणार असाल तर हा काही स्टंट उभा केला आहे. अशा अपवित्र विचारांचे लोकं नको यामुळे शिवसैनिकांनी केलं असेल असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेने काय केलं? राणेंचा सवाल


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -