Ind vs Aus: क्रिकेट सामन्यातही ’50 खोके, एकदम ओके’; सामन्यावेळी शिवसैनिकांची पोस्टरबाजी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात एका प्रेक्षकाने "50 खोके एकदम ओके'', असे पोस्टर झळकावल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मालिकेत विजय मिळवला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात एका प्रेक्षकाने “50 खोके एकदम ओके”, असे पोस्टर झळकावल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मालिकेत विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्माने तुफान फंलदाजी करत भारताला विजय मिळवून दिला, व मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. त्यामुळे तिसरा सामना भारत आणि ऑस्ट्रेलियासाठी मालिका विजयासाठी महत्वाचा असणार आहे. (shivsainik shows poster against cm eknath shinde and fadnavis government during india vs australia match)

मख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करत राज्यात सरकार स्थापन केले. भाजपाशी युती करत एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केले असून, त्यापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस सोबतच्या आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी केली होती. परंतू, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेकडून गद्दार, 50 खोके एकदम ओके अशा शब्दांत हल्लाबोल करण्यात आला.

राज्यभरात 50 खोके एकदम ओके या घोषणांवरून राजकारण सुरू असून, शिवसेना आणि शिंदे गटातील नेते मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. मात्र, हेच 50 खोके एकदम ओकेचे पोस्टर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या समान्यातही दाखवण्यात आले. या पोस्टरची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना नागपूरमध्ये झाला. या सामन्यावेळी चंद्रपूरमधील शिवसैनिकांनी हातात पोस्टर धरून शिंदे सरकारवर टीका केली. 50 खोके एकदम ओके एमएच 34 असे लिहिलेले पोस्टर क्रिकेट प्रेमींनी हातात धरले होते. शिवसेना प्रवक्त्या आणि पूर्व विदर्भ महिला संपर्क प्रमुख प्राध्यापक शिल्पा बोडखे यांनी हा फोटो शेअर केला आहे.


हेही वाचा – IND-W vs ENG-W : ‘हा आमचा खिलाडूपणा…’; हरमनप्रीत कौरचे इंग्लंडला चोख प्रत्युत्तर