खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना खार पोलीस स्टेशनमध्ये भेटण्यासाठी गेलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. हल्ल्यात गाडीच्या काचा फुटल्या असून सोमय्या जखमी झाले आहेत. याबाबतची माहिती सोमय्या यांनी ट्विट करत दिली.
नवनीत राणा आणि रवी राणा खार पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर आता भाजपचे नेते किरीट सोमय्या हे खार पोलीस स्टेशनला पोहोचले. यानंतर शिवसैनिक देखील पोलीस स्टेशन बाहेर जमले आणि किरीट सोमय्या यांच्याविरोधात घोषणाबाजी देत होते. त्यानंतर सोमय्या पोलीस स्टेशनमधून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या कारवर शिवसैनिकांनी हल्ला केला.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -