घरमहाराष्ट्रपुणेविनायक मेटेंचा घातपात? आयशर ट्रकने पाठलाग करत कट मारला होता, कार्यकर्त्याचा दावा

विनायक मेटेंचा घातपात? आयशर ट्रकने पाठलाग करत कट मारला होता, कार्यकर्त्याचा दावा

Subscribe

हा ट्रक मेटे यांच्या गाडीला कट मारण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्याने सांगितलं. एका मराठी वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत अण्णासाहेब वायकर या कार्यकर्त्याने हा दावा केला आहे. 

माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले असले तरीही त्यांचा घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. तसंच, त्यांच्या पत्नीनेही याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे अपघात झाला त्या ठिकाणी कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, शिवसंग्राम संघटनेच्या एका कार्यकर्त्याने खळबळजनक दावा केलाय. एका आयशर ट्रकने काही दिवसांपूर्वी पुण्यात विनायक मेटे यांच्या गाडीचा पाठलाग केला होता. तसेच, हा ट्रक मेटे यांच्या गाडीला कट मारण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्याने सांगितलं. एका मराठी वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत अण्णासाहेब वायकर या कार्यकर्त्याने हा दावा केला आहे.

३ ऑगस्ट रोजी विनायक मेटे बीडहून पुण्यात परतत होते तेव्हा त्यांचा गाडीचा पाठलाग झाला असल्याची माहिती मेटे यांच्या सहाकाऱ्याने वायकर यांना दिली होती. पुण्यापासून २० किलोमीटरवर असल्यापासून या आयशर ट्रकने मेटे यांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला होता. चॉकलेटी रंगाच्या आयशर ट्रकने मेटेंच्या गाडीला दोन ते चारवेळा कट मारली. त्यामुळे गाडी बाजूला घेऊन ट्रकचालकांना जाब विचारूया असं मेटेंच्या कार्यकर्त्याने सांगितलं. मात्र, विनायक मेटे यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. ते दारू पिऊन आले असतील म्हणून त्यांनी ट्रकचालकाला जाब विचारला नाही. दरम्यान, आयशर ट्रकने २ किमी अंतरवर मेटेंच्या गाडीचा पाठलाग केला होता, असंही कार्यकर्त्याने सांगितलं.

- Advertisement -

तपासासाठी पोलिसांची आठ पथके!

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या अपघाताची चौकशी सुरू केली असून त्यासाठी फॉरेन्सिकसह आठ पथके नेमण्यात आली आहेत. लवकरच सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील, अशी माहिती पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी दिली. वाहनचालक एकनाथ कदम यांची रसायनी पोलिसांकडून चौकशी सुरू असून त्यांचा जबाब नोंदवला जात आहे. या अपघातात एकनाथ कदम सुदैवाने बचावले आहेत. त्यांना किरकोळ इजा झाल्याचे सांगण्यात येते. त्यांची वैद्यकीय चाचणी देखील करण्यात येणार आहे.

 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -