Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र सिंधुदुर्गात इंधनदरवाढीविरोधात पुन्हा शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा

सिंधुदुर्गात इंधनदरवाढीविरोधात पुन्हा शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा

स्थानिक पोलिसांकडून या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Related Story

- Advertisement -

शिवसेनेच्या ५५ वर्धापनादिनीनिमित्त आज सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु झाला आहे. शिवसेनेच्या वतीने आज कुडाळमध्ये महागाईविरोधात प्रातिनिधीक आंदोलन सुरु होते. यावेळी वर्धापनादिनीनिमित्त कुडाळमधील शिवसेनेचे स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी भाजपा कार्यकर्त्यांना १ लिटर पेट्रोल मोफत वाटण्याचे जाहीर करत इंधनदरवाढी विरोधात अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. तसेच आमदार वैभव नाईक हे भाजपा कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले.मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना रोखले.

शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त वैभव नाईक यांनी इंधनदरवाढीच्या मुद्द्यावरून भाजपला डिवचण्यासाठी १ रुपये पेट्रोल देण्याचा उपक्रम सुरु केला. मात्र हा पेट्रोल पंप नारायण राणे यांच्याच मालकीचा निघाला. वैभव नाईक भाजपाचे ओळखपत्र दाखवणाऱ्यांना पेट्रोल खरेदी करण्याची पैसे वाटत होते. यावेळी भाजपाचे कार्यकर्ते त्याठिकाणी आले आणि त्यांनी आक्षेप घेतला. यावेळी भाजपाच्या राणे समर्थकांनीही शिवसेनेविरोधात घोषणाबाजी सुरु केली. यादरम्यान शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरु झाली. त्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस दंगल नियंत्रक पथक आणि स्थानिक पोलिसांकडून या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु कार्यकर्त्यांमधील वाद थांबण्याचे नाव घेत नव्हते.

- Advertisement -

अद्यापही शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते. शिवसेनेकडूनही महागाई आणि इंधनदरवाढीमुळे केंद्र सरकारविरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आले. परंतु वैभव नाईकांनी पेट्रोल पंप बदलत आता इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर भाजपा कार्यकर्त्यांना ११ ते १ पर्यंत मोफत पेट्रोल देण्याचा उपक्रम सुरु केले आहे.


 

- Advertisement -