घरताज्या घडामोडी'राज्यात दिल्लीसारखी स्थिती होऊ देणार नाही'

‘राज्यात दिल्लीसारखी स्थिती होऊ देणार नाही’

Subscribe

'दिल्लीसारखी स्थिती महाराष्ट्रात होऊ नये. तसेच प्रजासत्ताक दिनानंतर राज्यात 'प्लास्टिक बंदी' कडक करणार आहे', अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी वाढत्या प्रदूषणावर चिंता व्यक्त करताना दिली.

‘दिल्लीसारखी स्थिती महाराष्ट्रात होऊ नये. तसेच प्रजासत्ताक दिनानंतर राज्यात ‘प्लास्टिक बंदी’ कडक करणार आहे’, अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी वाढत्या प्रदूषणावर चिंता व्यक्त करताना दिली आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज, २६ जानेवारीच्या निमित्ताने पर्यावरण जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांनी ‘मी माझ्या वाढदिवसाला किमान एक झाड लावेन आणि त्याचे संगोपन करेन’, अशी शपथ यावेळी विद्यार्थ्यांसहित सर्वांनीच घेतली. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेदेखील उपस्थित होते.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

मुंबईमधील मॉल्स, हॉटेल्स आणि पब्जना २४ तास खुले ठेवण्याचा प्रस्ताव आदित्य ठाकरे यांनी मांडला असून या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे. मात्र, या निर्णयावर विरोधकांनी आक्षेप घेत टीका देखील केली आहे. यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘या होणाऱ्या टीकेला उत्तर द्यावे, असे वाटत नाही. मन दूषित असेल तर दृष्टीकोनही तसाच असतो. महाराष्ट्रातील जनतेचे मन स्वच्छ आहे. तसेच दुकाने रात्री उघडी राहिल्याने फायदाच होईल. रोजगाराची संधी निर्माण होईल. महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेत आहेत’, असे देखील ते पुढे म्हणाले आहेत. तसेच त्यांनी टीका करणाऱ्या नेत्यांना हिंमत असेल तर त्यांनी केंद्र सरकारला नोटाबंदी, जीएसटीसारख्या निर्णयांबद्दल विचारुन दाखवावे’, असा टोला देखील लगावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मनसे पक्षाचा नवा झेंडा ‘असा’ असणार


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -