घरमहाराष्ट्र'...मलाच वनमंत्री करा'; शिवसेना नगरसेवकाचं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

‘…मलाच वनमंत्री करा’; शिवसेना नगरसेवकाचं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

Subscribe

वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त जागेवर विराजमान होण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार लॉबिंग सुरू

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वाढत्या दबावानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी २८ फेब्रुवारी रोजी राजीनामा दिला. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर वनमंत्र्यांना आपला राजीनामा दिला आणि तो भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूर देखील केला. दरम्यान राठोड यांच्या राजीनाम्यानंतर वनमंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू झाली आहे. संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यामुळे वनमंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. या पदाकरता काही जणांची नावं चर्चेत होती तर काही जणांनी या पदावर दावा केल्याचेही पाहायला मिळाले. वनमंत्री पद रिक्त झाल्याने आता या पदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता असताना संजय राठोड यांच्याच मतदार संघातील दारव्हा नगरपरिषदेतील शिवसेना नगरसेवकाने या पदावर दावा केला आहे. या नगरसेवकांना थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले असून माझा दांडगा अभ्यास आहे, मलाच वनमंत्री पदावर विराजमान करा, अशी मागणी केली आहे. या नगरसेवकाचे नाव रवी तरटे असे असून ते दारव्हा येथील प्रभाग ४ मधील नगरसेवक असल्याचे सांगितले जात आहे.

असं म्हटलं आहे पत्रात…

रवी तरटे या शिवसेना नगरसेवकाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. त्यात ‘माझा अभ्यास दांडगा, मला वनमंत्री करा’ अशी मागणी केली आहे. सध्या रवी तरटे यांच्या पत्राची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगताना दिसतेय . रवी तरटे यांनी पत्रात असे म्हटले की, गेल्या ५ वर्षांपासून शिवसेना पक्षात निष्ठावंत म्हणून काम केले आहे. समाजकारणासह राजकारण या विषयावर माझा चांगला दांडगा अभ्यास आहे. इतर पक्षातील नेते या पदासाठी चढाओढ करत असून माझी शिवसैनिक म्हणून या पदावर निवड करण्यात यावी.’ यासह त्यांनी असे नमूद केले की, ‘माझी मंत्रीमंडळात नियुक्ती केल्यास विदर्भाला मंत्रीमंडळात स्थान मिळेल. राठोड यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त जागेसाठी पक्षात चढाओढ लागली आहे. विधानसभा मतदारसंघातील असून मला संजय राठोड यांचेही मार्गदर्शन लाभेल. माझ्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन मला विधान परिषदेवर घेऊन वन खात्याचं मंत्रीपद द्यावं.’

- Advertisement -

राठोडांच्या राजीनाम्यानंतर ‘या’ पदासाठी लॉबिंग सुरू

दिनांक २८ फेब्रुवारी रोजी संजय राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर गुरूवारी दुपारी मुख्यमंत्र्यांनी राठोंडाचा राजीनामा मंजूर केला. त्या क्षणापासून वनमंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू झाली असून काही नेत्यांची नावे समोर येत आहेत. सध्या मुख्यमंत्र्यांकडे वनमंत्रीपदाचा कार्यभार असून आता पुढील वनमंत्री कोण याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे राठोड यांच्या राजीनाम्यानंतर वनमंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू झाले असून वनमंत्रीपदासाठी नितीन देशमुख, आशिष जयस्वाल ही दोन नाव सध्या चर्चेत असून यासोबत आणखी काही नावं चर्चेत असल्याने आता कोण वनमंत्री पदावर विराजमान होतं याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.


राठोडांच्या राजीनाम्यानंतर वनमंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू; ‘या’ आमदारांची नावे चर्चेत

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -