घरमहाराष्ट्रराज्यात नाट्य चळवळ सुरु आहे, उद्याच्या दसऱ्या मेळाव्यात उत्तर मिळेल - राऊत

राज्यात नाट्य चळवळ सुरु आहे, उद्याच्या दसऱ्या मेळाव्यात उत्तर मिळेल – राऊत

Subscribe

दसऱ्या मेळाव्याला शिवसेना पक्ष प्रमुखांची तोफ धडाडते. उद्या ती तोफ धडाडणार आहे. महाराष्ट्रातले जे प्रश्न आहेत, महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी दोन वर्ष काही कामधंदा उरला नसल्याने जी नाटक चळवळ सुरु केली आहे, त्या नाटक चळवळीला चांगलं उत्तर दिलं जाईल, असा इशारा शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी विरोधकांना दिला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा हा षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे. यावरुन देखील शिवसेनेवर टीका करण्यात आली. कोरोनाच्या काळात सभा घेण्यासा परवानगी नसताना शिवसेनेला परवानगी कशी देण्यात आली, असा सवाल केला जात आहे. यावर देखील राऊत यांनी उत्तर दिलं आहे. संपूर्ण नियम आणि कायदा यांचं भान ठेवून हा मेळावा होईल. त्यावर कोणी जरी टीका करत असले तरी त्या टीकेला अर्थ नाही, असं संजय राऊत म्हणाले. पुढे सांगताना त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून उद्या देशाच्या, महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी, राज्याच्या विकासाविषयी अशा अनेक प्रश्नांवर भाष्य करतील, असं सांगितलं.

- Advertisement -

२०२१४ ला त्या रावणाला जाळूया

देशभरात पेट्रोल-डिझेल तसंच गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडत आहेत. सर्वसामान्यांना परवडत नाही आहेत. यावर भाष्य करताना संजय राऊत यांनी महागाई सारखा राक्षस आपण २०२४ ला जाळायचा आहे. त्याची सुरुवात उद्याच्या रावण दहनापासून करु, असं संजय राऊत म्हणाले.

 

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -