घरताज्या घडामोडीकरोनाने 'बर्ड फ्लू' लाही मागे टाकले, शिवसेनेचे केंद्राला साकडे

करोनाने ‘बर्ड फ्लू’ लाही मागे टाकले, शिवसेनेचे केंद्राला साकडे

Subscribe
राज्यात अनेक ठिकाणी कोंबड्यांना १० रूपयांचा दर मिळण्यापासून ते कोंबड्या फुकट वाटण्याचेही प्रकार घडले आहेत.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात कोंबडी आणि अंड्यांची मागणी अचानक मोठ्या प्रमाणात घटल्याने मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या कुक्कुटपालन (पोल्ट्री) व्यावसायिकांना केंद्र सरकारने त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने केंद्र सरकारला करण्यात आली आहे. या संदर्भांत, लोकसभेतील शिवसेना गटनेते विनायक राऊत यांच्यासह खासदार राहुल शेवाळे, अरविंद सावंत, हेमंत गोडसे, राजेंद्र गावित यांच्या शिष्टमंडळाने, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लेखी निवेदन सादर केलेे.
कुक्कुटपालन व्यवसायासाठी आर्थिक आधार द्यावा अशी मागणी शिवसेनेने अर्थमंत्र्यांना केली आहे
शिवसेना खासदारांनी आपल्या निवेदनात, पोल्ट्री व्यावसायिकांवर कोसळलेल्या आर्थिक संकटाची माहिती दिली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभर भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा परिस्थितीत, कोंबडी आणि अंडी यांची मागणी अचानक घटल्याने, पोल्ट्री व्यवसाय उद्धवस्त झाला आहे. 2006 आणि 2010 मध्ये बर्ड फ्लू मुळे झालेल्या नुकसनापेक्षाही मोठे नुकसान यावेळी कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचे झाले आहे. त्यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करण्याची मागणी या पत्रकात करण्यात आली आहे.
करोनाच्या धास्तीने कोंबड्यांचे दर विशेषतः ब्रॉयलर कोंबड्यांचे दर घाऊक बाजारात 100 रुपयांवरून 25 रुपयांपर्यंत खाली घसरले आहेत. काही ठिकाणी तर कोंबड्या किलोला 10 रुपये दराने विकल्या जात असल्याने कुक्कुटपालन व्यावसायिक डोक्याला हात मारत आहेत. मुद्दल राहिली दूर, पण तोटा सोसूनही कुणी कोंबड्या विकत घ्यायला तयार नाही, अशी त्यांची परिस्थिती आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -