घरताज्या घडामोडीकुटुंबावर खोटे आरोप करण्याला हिंदूत्व नव्हे, नामर्दपणा म्हणतात, मुख्यमंत्र्यांचा भाजपवर हल्लाबोल

कुटुंबावर खोटे आरोप करण्याला हिंदूत्व नव्हे, नामर्दपणा म्हणतात, मुख्यमंत्र्यांचा भाजपवर हल्लाबोल

Subscribe

तुमची पालखी वाहण्यासाठी शिवसैनिक जन्मला नाही

कोणाच्याही कुटुंबावर, वैयक्तिक, आणि पत्नीवर खोटे आरोप करणे हे हिंदूत्व नाही तर नामर्द म्हणतात अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना दसरा मेळाव्यात संवाद साधताना भाजपच्या टीकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. शिवसेनेवर वारंवार हिंदूत्वाच्या मुद्द्यावर करण्यात येणाऱ्या टीकेवर मुख्यमंत्र्यांनी भाष्य करत विरोधकांना चांगलेच सुनावले आहे. शिवसैनिक तुमच्या पक्षाच्या पालखीचे भोई झाले नाही म्हणून ते भ्रष्टाचारी झाले का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला आहे. तसेच हर्षवर्धन पाटील यांच्यावरुनही भाजपवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, कोणाच्याही कुटुंबावरती, वैयक्तित, पत्नीवरती, मुलांवरती खोटे आरोप करणे हे हिंदूत्व नाही याला नामर्द किंबहून अक्करमाशा म्हणतात मर्द कसा शिवरायांचे नाव घ्यायचे असेल तर मर्दासारखे गेले पाहिजे कोणाच्यातरी आडून हल्ले करायचे आणि म्हणायचे तो मी नव्हेच किती शंड आहेस तु असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

तुमची पालखी वाहण्यासाठी शिवसैनिक जन्मला नाही

मानाची पालखी माझ्या देशाची असेल, भारतमातेची आहे परंतु तुमच्या पक्ष्याची पालखी वाहण्यासाठी शिवसैनिकाचा जन्म झाला नाही. देवदेश आणि धर्मासाठी शिवसैनिकाचा जन्म झाला आहे. पण तो शिवसैनिक तु्म्ही भ्रष्ट ठरवला आहे कारण तो तुमच्या पालख्या वाहत नाही. हे आमचे हिंदूत्व नाही. वाईट काळात सोबत असलेला सहकारी, सोबती तेव्हा चालत होता म्हणजे हर्षवर्धन पाटील आज तुमच्या भाजपात आल्यानंतर पवित्र झाले. गटाराचे पाणी तुमच्यामध्ये टाकले तर ते गंगा आणि तेच पाणी दुसरीकडे टाकले तर गटार गंगा हेच जी काही थेरं चालू आहेत ते हिंदूत्व नाही आहे.

हिंदूत्वाची, देशभक्तीची पालखी वाहणारे भोई

कुर्ला चेंबूर भागातील एक झोपडपट्टी होती. तिकडे गेलो होतो पाहतो तर काय एका घरात सगळं उध्वस्त झालं होते, अंगावर शहारा आला, रक्त पडले होते. कपडे पडले होते. बांगड्या फुटल्या होत्या शिवसैनिकांना विचारले काय झाले इकडे? त्यांनी सांगितले एकटी बाई घरात होती घरातील पुरुष मंडळी कामावर गेली होती. एकटी महिला पाहून हैवान घरात घुसले होते. त्यांना विचारले मग? ते म्हणाले मग काही नाही त्यांच्याकडे तलवार, हत्यारे सगळं काही होते. त्यांना बाजूला नेले तिकडे एक पडकी भींत होती. ती भींत धक्के मारुन पाडली आणि त्याच्या एक एक विटांचा हैवानांवर मारा केला त्यामुळे ते हैवान पळून गेले हा माझा शिवसैनिक, कोण होते का तिकडे? तोच शिवसैनिक आज केवळ तुमची पालखी वाहत नाही म्हणून भ्रष्टाचारी झाली त्याच्यावर आरोप करत आहात. मागेही सांगितले आणि आताही सांगत आहोत होय आम्ही पालखीची भोई आहोत पण ती आमच्या राष्ट्रभक्तीची, देशभक्तीची आणि हिंदूत्वाची पालखी आहे तुमची पालखी वाहणारे आम्ही भोई नाही आहोत.

- Advertisement -

हेही वाचा : सावरकर, गांधी उच्चारण्या एवढी आपली लायकी तरी आहे का? मुख्यमंत्र्यांचा घणाघात


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -