एका रिक्षावाल्याकडे कोट्यवधी रुपये आले कुठून? शिवसेनेची मुख्यमंत्री शिंदेंवर जहरी टीका

shivsena ex mp chandrakant khaire slams cm eknath shinde ask how does rickshaw driver becomes so rich

महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत मोठी फूड पडली आहे. शिवसेनेच्या आमदारांसह आता खासदारही शिंदे गटात सामील होत आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाहीर मेळावे,सभा आणि शिवसैनिकांच्या गाठीभेटी घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर काल संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद) आदित्य ठाकरेंचा शिवसंवाद यात्रा होती. यावेळी झालेल्या सभेत शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे. एका रिक्षावाल्याकडे एवढे कोट्यवधी रुपये कुठून आले? असा प्रश्न विचारत खैरेंनी जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदेंना डिवचले आहे.

यावेळी खैरे म्हणाले की, इथे जमलेले सर्व ठाकरे परिवाराचे समर्थक आहेत. ही जनता फक्त ठाकरे कुटुंबाला मानते. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे… यावेळी खैरेंनी मंचावर बसलेल्या आदित्य ठाकरेंकडे पाहत म्हटले की, आपण आता ज्या मार्गाने आलात त्यावर मार्गावर किती लोक थांबले आपण पाहिलेच असेल, ठाकरे घराबाहरे पडताच त्यांच्या भोवती एक वलय निर्माण होते.

हेही वाचा : नाशिक जिल्ह्यात शिवसेनेचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’

खैरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र डागत म्हटले की, मला आश्चर्य वाटते की, 1997 सालानंतर एक रिक्षाावाला एवढे कोट्यवधी रुपये कसे जमा करु शकतो? या प्रश्वावरचं खैरे पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे ईडी का नाही? आमच्या एका- एका कार्यकर्त्यांमागे ईडी लावता तुम्ही, मग शिंदेंच्या पाठीमागे ईडी का नाही? असा दुसरा सवाल खैरेंनी उपस्थित केला.

हेही वाचा : सेनेने राऊतांना आवर घालणे गरजेचे; खासदार हेमंत गोडसे यांचा घणाघाती आरोप

बंडखोर आमदारांना 50 – 50 खोके दिले. किती खर्च केले? इतके पैसे रिक्षावाला असणाऱ्या दाढीने आणले कुठून? किती लुटले? अशा प्रश्नांची सरबत्ती खैरेंनी सुरु केली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरु आनंद दिघेंचा उल्लेख करत  खैरेंनी पुन्हा निशाणा साधला.आनंद दिघे साहेबांच्या आशिर्वादाखाली तुम्ही मोठे झाले आणि आनंद दिघेंना विसरुन गेले. त्यांच्याच चित्रपटात दाखवलं आहे ना, गद्दारांना माफी नाही. काही लपणार नाही. मुंबई ठाण्याच्या लोकांना कळू लागलय, असही खैरे म्हणाले.


हेही वाचा : चंद्रकांत पाटलांनी वाटल्यास डोक्यावर दगड ठेवावा… पवारांचा खोचक टोला