माजी नगरसेविका शीतल म्हात्रेही शिंदे गटात सामील होणार?

त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारीही शिंदे गटात सामिल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी नक्कीच ही मोठी घडामोड ठरणार आहे.

दिवसेंदिवस शिवसेनेला खिंडार पडत असून माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यासुद्धी शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे. आज त्या एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं समोर येत आहे. तसेच, त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारीही शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी नक्कीच ही मोठी घडामोड ठरणार आहे. (Shivsena former Corporator Sheetal Mhatre also entered in Shinde group?)\

हेही वाचा – आज ना उद्या ही सत्ता बरखास्त करणारच, नव्या सरकारबाबत शरद पवारांचा ठाम निर्धार

गेल्या काही दिवसांत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई येथील शिवसैनिक शिंदे गटात सामील झाले आहेत. दरम्यान, मुंबईतील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी मात्र कोणतीही ठोस भूमिका घेतली नव्हती. मात्र, आता मुंबई उपनगरातील माजी नगरसेविका शीतल म्हात्रे सुद्धा शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर शिवसेनेसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.