गिरीश महाजनांनी उपमा देताना प्राणी आणि पक्ष्यांचा अभ्यास करावा; किशोरी पेडणेकरांचा पलटवार

shivsena kishori pednekar slams girish mahajan cm uddhav thackeray sabha statement
गिरीश महाजनांनी उपमा देताना प्राणी आणि पक्ष्यांचा अभ्यास करावा; किशोरी पेडणेकरांचा पलटवार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर भाजप नेत्यांकडून टीकेची झोड उठवण्यात आली आहे. भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी देखील मुख्यमंत्र्यांनी सभेत केलेल्या वक्तव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना म्हणजे गटारातील बेडूक आहे. यांनी जगात काय चालले आहे ते बघावं, संपूर्ण देश मोदीजींकडे बघतो आहे, मोदीजींवर बोलण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. या टीकेला आज मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.

“गिरीश महाजन यांना प्राणी आणि पक्ष्यांचा अभ्यास करावा लागेल. बेडूक हा अतिशय चांगल्या पाण्यावर राहतो. बेडूक तुम्हाला कधीच गटारात सापडणार नाही. गटारात सापडतात ते गांडूळ सापडतात आणि मागच्या वेळी गांडूळ कशातून बाहेर आले ते मी सांगितलं आहे. त्यामुळे बेडकाबद्दल बोलत असाल तर तो खूप स्वच्छ चांगल्या पाण्यावर राहतो. त्यामुळे उपमा देताना अभ्यास करून द्या. त्यांच राहणीमान समजा, त्यामुळे उपमा देताना तोल जाऊ देऊ नका, खूपचं पाया- खालची जमीन सरकतेय. त्यामुळे थोडं संयमाने वागा असा सांगण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच संयमाच्या नेतृत्त्वाने उत्तर दिल्यानंतर मिरच्या नाकाला लागलेल्या दिसतायतं. मराठी भाषेचं सगळ्यांनी ज्ञान आहे तर त्याचा वापर नीट करा.” अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांनी महाजनांच्या टीकेवर पटलवार केला आहे.

“आमदार आहेत त्यांनी बोलण्याचे भान ठेवा, इतकी वर्षे निवडून आलेले आमदार आहेत त्यांनी नीट बोला. आता तेही आम्ही सांगायला हवे का की तेही संस्कार विसरले आहेत. नीट बोलायचे संस्कार महाजन विसरले का? मी महाजनांपेक्षा अनुभवाने लहान असेन, मी आमदार नाही तरी पण चाललेल्या या घडामोडींमध्ये सक्रिय आहे. त्यामुळे एकतर महिलांबरोबर बोलताना नीट बोलायचं. बोलण्याचं भाजप नेत्यांना भानचं राहत नाही का? महिलांचा अपमान करायचं असं भाजपने सुपारी घेऊन ठरवलचं आहे का? महाविकास आघाडी सरकारमधील महिलांचा अपमान मी सहन करुन घेणार नाही. असा घणाघात किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.


शिवसेनेने हिंदुत्व सोडलं नाही असं सांगण्याची बाळासाहेबांवर वेळ आली नाही, दानवेंचे टीकास्त्र