बंडखोर आमदारांना डोळ्यात डोळे घालून बोलावेच लागणार; आदित्य ठाकरेंचा इशारा

aditya thackeray

शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आता शिवसेनेतील बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यात आज एकनाथ शिंदे यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवल्याने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. यावर  शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाने दिलासा देत आमदारांना उत्तर देण्यासाठी 11 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. हा निर्णय ठाकरे सरकारला मोठा धक्का मानला जात आहे. या निर्णयामुळे आता पुढील काही दिवस महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेलेच राहील आहेत.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांनी या बंडखोर आमदारांना इशारा दिला आहे. बंडखोर आमदारांना कधी ना कधी डोळ्यात डोळे घालून बोलावेच लागणार आहे. माझ्यासमोर बसून माझ्याशी नजर मिळवत काय चुकीचं आहे, हे सांगावं लागणार असा इशारा आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना दिला आहे. आदित्य ठाकरे आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते. (shivsena leader aditya thackeray said who who betrays never win lak)

यावेळी आदित्य ठाकरे फ्लोअर टेस्टबाबत म्हणाले की, आजचा सुप्रीम कोर्टाचा निकाल महत्त्वाचा आहे. राजकीय घडामोडी घडतच असतात, जो निकाल येईल तो येईलच. पण तरीही विजय मिळेल, हा विश्वास आहे. बंडखोरी करणारे कधी विजयी होत नसतात. पळून जाणारे कधी विजयी होत नाहीत. फ्लोअर टेस्टसाठी ते तयार आहेत की, नाही हा प्रश्न आहे. फ्लोअर टेस्टपेक्षा जे कोणी पळून गेले आहेत, त्यात काही आमचे पण आहेत, जे सतत संपर्कात आहेत. आमची सुटका करा, आम्हाला फसवलं गेलं आहे, असं ते सांगत आहे. पण ज्यांनी दगा-फटका केला त्यांनी डोळ्यात डोळे घालून बोलावं ही खरी फ्लोअर टेस्ट आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

बंडखोरांना कधी ना कधी समोर यावेच लागणार आहे, डोळ्यात डोळे घालून बोलावे लागणारचं आहे. हे राजकारण नाही तर हा सर्कसचा खेळ झाला आहे, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली आहे. जे पळून गेले आहे जे स्वत:ला बंडखोर म्हणवत आहेत, आमदारांना बंडखोरी करायचीच होती तर त्यांनी इथे हिमतीने करायची होती. राजीनामा देत, निवडणुकीसाठी उभे रहायचे होते, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले.


कधीही निवडून न आलेले संजय राऊत पक्ष संपवायला निघालेत, दीपक केसरकरांचे पत्र