घरमहाराष्ट्रतुम्ही कोण ,त्याचं आधी उत्तर द्या- अंबादास दानवेंचा शिंदे गटाला सवाल

तुम्ही कोण ,त्याचं आधी उत्तर द्या- अंबादास दानवेंचा शिंदे गटाला सवाल

Subscribe

न्यायाधीशांनी शिंदे गटाला तुम्ही कोण आहात? असं विचारलं . यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद रंगला आहे.

राज्याच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेसह इतर याचिकांवर २७ सप्टेंबरला सुनावणी होईल असे न्यायालयाने सांगितले. मात्र यादरम्यान, न्यायाधीशांनी शिंदे गटाला तुम्ही कोण आहात? असं विचारलं . यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद रंगला आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी न्यायालयाच्या सुनावणीवरून शिंदे गटावर टीका केली आहे. जालना येथे बोलताना दानवे म्हणाले की कोर्टात न्यायाधीशांनी शिंदे गटाला तुम्ही कोण आहात असं विचारले. यामुळे त्यांना आता आधी या प्रश्नांच उत्तर द्याव लागले. नंतर इतर प्रश्न निकाली लागतील. तसचे शिंदे गटाने न्यायालयात शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याची मागणी केली. यावरही दानवे यांनी शिंदेगटाला लक्ष्य केलं. ते म्हणाले कि शिंदे गटाला आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याची भीती वाटतेय. त्यांनी निवडणुकीचा धसका घेतला आहे. असे टिकास्त्र दानवे यांनी शिंदेगटावर सोडले. त्याचबरोबर सध्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यावरून सुरू असलेल्या वादावरही दानवे म्हणाले की शिवसेनेचा दसरा मेळावा गेली ५६ वर्ष शिवाजी पार्कवरच होत आहे. यावेळी देखील शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार. शिवसैनिकांना उध्दव ठाकरे मार्गदर्शन करणार.ही लोकशाही आहे यामुळे सरकारला जनतेच्या मतानुसार वागाव लागणार आहे. दादागिरी करून चालणार नाही. असे बोलत दानवे यांनी शिंदे गटाला इशाराच दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -