नाव राष्ट्रवादी अन् काम कुटुंबवादी, भास्कर जाधव यांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल

shivsena leader bhaskar jadhav slams ncp leader sunil tatkare

केवळ नाव राष्ट्रवादी पण काम मात्र कुटुंबवादी अशा शब्दांमध्ये शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. कुणबी समाजाला एक जागा सोडा म्हटल्यानंतर सुनील तटकरेंना मिरच्या का झोंबल्या? असा प्रश्न भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे. तसेच खोट्या कंपन्या स्थापन करण्याच्या नावाखाली तटकरेंनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे. विधान परिषदेची एक जागा कुणबी समाजाला सोडावी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली होती.

शिवसेना नेते आणि विधानसभेचे आमदार भास्कर जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. विधान परिषदेची एक जागा कुणबी समाजाला सोडण्यात यावी अशी मागणी भास्कर जाधव यांची होती. यावरुन तटकरेंना का मिरच्या झोंबल्या? असा प्रश्न जाधव यांनी केला आहे.

तटकरेंवर बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर खोट्या कंपन्या स्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या असल्याचा आरोप आहे. तसेच त्यांनी १० ते १५ हजार कोटी रुपयांची संपत्ती गोळा केली असल्याचाही आरोप असल्यामुळे अशा व्यक्तीला मार्गदर्शन करण्याची कुवत माझ्यात नाही. त्यासाठी समोरच्या व्यक्तीकडे जाण, जाणीव आणि नितिमत्ता असावी लागते. जी तटकरे यांच्याकडे नाही. कारण त्यांना फक्त द्यायचे माहिती आहे घ्यायच माहिती नाही अशा शब्दात भास्कर जाधव यांनी सुनील तटकरे यांच्यावर घणाघात केला आहे.

माझ्या पराभवासाठी कारस्थान केलं

माझ्या विजयामध्ये सुनील तटकरे यांचे कोणतेही योगदान नाही आहे. परंतु त्यांच्या खासदार होण्यामध्ये माझं योगदन आहे. तटकरे माझ्या पराभवासाठी अनेक प्रयत्न करत होते. त्यांनी कायम मदत करणाऱ्यांचेच वाटोळ केलं असल्याची टीका सुनील तटकरे यांनी केली आहे.


हेही वाचा: जबरदस्तीने कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या, वाझेचा NIA विरोधात सनसनाटी आरोप