घरमहाराष्ट्रठाकरेंना बोलू नका; किशोरी पेडणेकरांकडून केसरकरांना सुनावले

ठाकरेंना बोलू नका; किशोरी पेडणेकरांकडून केसरकरांना सुनावले

Subscribe

शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेल्यानंतर आमदार दीपक केसरकर यांना शिंदे गटात प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यानंतर राजकारणात आता उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा वाद रंगताना दिसतोय. दरम्यान केसरकरांकडून सातत्याने संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंवर हल्लाोल केला जातोय. आदित्य ठाकरे खासदार संजय राऊत यांची भाषा बोलू लागले, अशी टीका केसरकरांनी केला आहे. दरम्यान या टीकेला आता मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांना विचारण्यात आले. दीपक केसरकर हे उडते पंछी आहेत, इकडनं उड तिकडे बस, अशा शब्दात पेडणेकरांनी संताप व्यक्त केला आहे.

जे आमच्यासोबत राहतील त्यांच्यासोबत आम्ही फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊ आणि घेणार अशा शब्दात त्यांनी शिंदे गटाला ठणकावून सांगितले आहे. दीपाली सय्यद आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर पेडणेकर म्हणाल्या की, आजच्या घडीला सगळेच आशावादी आहेत. काही गोष्टी कायद्याच्या दृष्टीने अडचणीच्या आहेत. पण आजही आम्ही शिंदे गटाकडे बंधुत्वाच्या दृष्टीने पाहतो. त्यामुळे आशा बाळगण्यात काही गैर नाही, दीपाली सय्यद यांच्या मध्यस्थीने चांगलं काही घडणार असेल तर चांगलंच आहे. पण आलात तर तुमच्यासोबत नाही तर तुमच्याशिवाय अशी भूमिका किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

दरम्यान आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांवर दीपक केसरकरांनी केलेल्या टीकेवर पेडणेकर म्हणाल्या की, दीपक केसरकर हे उडते पंछी आहेत, इकडनं उड तिकडे बस, तिकडनं उड इकडे बस, त्यामुळे आमच्यासारख्या कट्टर शिवसैनिकांना त्यांच्याबद्दल विचारु नका” अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.

आम्ही सगळ्या त्सुनामी पाहल्या आहेत, त्या दर १५ वर्षांनी येतात, मी कोणाचं नाव घेणार नाही, पण झालेले नुकसान भरून काढण्याची ताकद शिवसैनिकांत आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. मुंबई महापालिकेवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा फडकणार, ज्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत, तर आदित्य ठाकर यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेचा भगवा फडकवणारचं असा विश्वास पेडणेकर यांनी व्यक्त केला.


माझ्या गुरुंसोबत, सदैव! आदित्य ठाकरेंनी शेअर केला वडील-आजोबांसोबतचा जुना फोटो


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -