घरमहाराष्ट्रएसआरएप्रकरणी किशोरी पेडणेकरांची अडचण वाढणार?, सोमय्यांकडून पुन्हा इशारा

एसआरएप्रकरणी किशोरी पेडणेकरांची अडचण वाढणार?, सोमय्यांकडून पुन्हा इशारा

Subscribe

संजय राऊतांनंतर किशोरी पेडणेकर यांचा नंबर असल्याचे चित्र दिसत होते. तर पेडणेकर यांच्याविरोधात आणखी एक कागदपत्र बाहेर काढणार असा इशारा किरीट सोमय्या यांनी केला आहे. यामुळे पेडणेकरांवर सोमय्या कोणता नवीन आरोप करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

माजी महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांच्या अडचणी एसआरए प्रकरणी वाढण्याची शक्यता आहे. एसआरएमध्ये २ प्रकरणांमुळे किशोरी पेडणेकर यांची दादर पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. गोमाता जनता एसआरए आणि दादरमधील एसआरए प्रकरणी ( SRA scam) किशोरी पेडणेकरांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांचा थेट संबंध येत नाही. आरोपीसोबत किशोरी पेडणेकर यांचे व्हॉट्सअप चॅट असल्यामुळे पेडणेकर यांची चौकशी करण्यात येणार आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एसआरएमध्ये घोटाळा केला असल्याचा आरोप केला आहे. एसआरएमध्ये १ कोटी ३५ लाख रुपयांचा घोटाळा झाला आहे. तसेच गोमाता जनता एसआरएमध्ये पेडणेकर यांनी खोटी माहिती देऊन गाळे आणि फ्लॅट्स कमी किमतीमध्ये विकण्याचा घोटाळा केला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला आहे. पेडणेकर यांच्यावरील आरोपामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा ठाकरे गट विरुद्ध भाजप असा सामना पाहायाला मिळाला. संजय राऊतांनंतर किशोरी पेडणेकर यांचा नंबर असल्याचे चित्र दिसत होते. तर पेडणेकर यांच्याविरोधात आणखी एक कागदपत्र बाहेर काढणार असा इशारा किरीट सोमय्या यांनी केला आहे. यामुळे पेडणेकरांवर सोमय्या कोणता नवीन आरोप करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

किशोरी पेडणेकरांवर आरोप कोणते?

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गोमाता जनता एसआरए प्रकल्पात कमी किंमतीमध्ये घरं विकण्याचा आरोप करण्यात आला आहे. पेडणेकरांनी काही गाळे आणि फ्लॅट्स कमी किमतीमध्ये विकत देण्याचे आश्वासन दिले होते. याच गोमाता जनता एसआरए इमारतीमध्ये सहाव्या माळ्यावरील घर स्वताचे असल्याचे पेडणेकरांनी प्रतित्रापत्रात २०१७ मध्ये म्हटलं आहे.

तसेच दादर येथील एसआरए प्रकल्पात किशोरी पेडणेकर यांनी गैरव्यवहार केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दादर एसआरए प्रकल्प घोटाळ्यात तीन आरोपी अटकेत आहेत. अटकेत असलेल्या महानगरपालिका वसाहत अधिकाऱ्याशी किशोरी पेडणेकर यांचे व्हॉटसअप चॅट समोर आल्यामुळे पेडणेकर यांचीसुद्धा चौकशी करण्यात येत आहे. दादर पोलिसांनी पेडणेकर यांची चौकशीसुद्धा केली होती. यानंतर त्यांना शनिवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु त्या हजर राहिल्या नाही. दादर एसआरए प्रकल्पात १ कोटी ३५ लाख रुपयांचा घोटाळा झाला असून हे पैसे ८ ते ९ जणांकडून घेण्यात आले आहेत.

- Advertisement -

आणखी एक कागदपत्र बाहेर काढणार – सोमय्या

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दादर एसआरए प्रकल्पातील तक्रारदार यांच्यासोबत दादर पोलीस स्टेशनमध्ये भेट दिली. पोलिसांकडून या प्रकरणाची माहिती घेतली. पोलिसांकडून माहिती घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सोमय्यांनी आणखी एक कागदपत्र बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला आहे. किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर आरोप केले आहेत. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरसुद्धा आरोपांची मालिका सुरु झाली असून आता या मालिकेत किशोरी पेडणेकर यांच्यावरील आरोप खरे निघतात का? जर हे आरोप खरे निघाले तर दादर पोलीस पेडणेकर यांच्यावर कोणती कारवाई करणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

एका महिलेवर कितीवेळा राजकीय अत्याचार करणार – पेडणेकर

दादर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी थेट किशोरी पेडणेकर मातोश्रीवर गेल्या होत्या. संघटनात्मक कामासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीमध्ये आरोपांसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र एका महिलेवर कितीवेळा राजकीय अत्याचार करणार असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. बदनामीला मी घाबरत नाही कारण माझ्या विभागात सगळ्यांना माझ्याबद्दल माहिती आहे. परंतु असे आरोप केले जातात याचा मला तिटकारा आला आहे. मी चौकशीलासुद्धा सामोरे जाणार असल्याचे किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.


हेही वाचा : टाटा एअरबसच्या पाठपुराव्याची साधी कागदपत्रंही उद्योग विभागाकडे नाहीत; मंत्री उदय सामंतांचा मोठा खुलासा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -