घरमहाराष्ट्रन्यायापेक्षा पीडितेच्या जखमांचे राजकीय द्वेषापोटी भांडवल करण्याचे भाजपचं वर्तन, नीलम गोऱ्हेंचा गंभीर...

न्यायापेक्षा पीडितेच्या जखमांचे राजकीय द्वेषापोटी भांडवल करण्याचे भाजपचं वर्तन, नीलम गोऱ्हेंचा गंभीर आरोप

Subscribe

पुण्यातील शिवेसना नेते रघुनाथ कुचिक कथित बलात्कार प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर पीडित तरुणीने गंभीर आरोप केले आहेत. यानंतर पीडितेच्या आरोपांवर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच यात आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावर आता शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी चित्रा वाघ आणि भाजपवर अनेक गंभीर आरोप केले आहे. “न्यायापेक्षा पीडितेच्या जखमांचा एक भांडवल केलं, मीठ चोळलं आणि त्या जखमांचा राजकीय द्वेषापोटी बाजार मांडण्याचे वर्तन भाजपकडून करण्यात आल्याचा” आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला आहे.

“राजकीय भांडवलासाठी मुलांचा वापर करणं मानवी अधिकाराच्या विरोधात”

नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, सातत्याने एक दिशाभूल करण्याचं वातावरण तयार केलं गेलं की, पीडितेला कोणीच मदत केली नाही, कोणीचं मदत केली नाही… पीडित तरुणी सत्य आहे की असत्य आहे हे सांगण्यासाठी मी न्यायदेवता नाही चित्रा वाघ न्यायदेवता नाहीत, ती मुलगी न्यायदेवता नाही. याची मर्यादा आणि बंधने प्रत्येकाने ठेवली पाहिजेत. उगीच कांगावा करून स्वत:ची कार्यपद्धती चुकल्यानंतर सरकारवर राजकीय भांडवल करण्यासाठी मुलांचा अशापद्धतीने वापर करणं हे मानवी अधिकाराच्या विरोधात आहे, संवेदनाहीन आहे. हे नमूद करावसं वाटत. सारखं त्या म्हणतात माय माऊल्यांनो लक्षात घ्या… अरे माय माऊल्यांनो अशापद्धतीने रोज तिच्यावर झालेल्या अत्याचाराचे वर्णन करून न्याय मिळतो का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

“पीडित मुलगी स्व:इच्छनेने सुद्धा तक्रार करु शकते. आपण सामाजिक संघटना म्हणून राजकीय कार्यकर्ते म्हणून एफीडेव्हीड सुद्धा करत शकतो. तसेच पोलिसांकडे 164 अन्वये जबाब नोंदवण्याची मागणी करु शकतो. त्या जबाबाला धरूनचं त्यामधीलचं सातत्याने मुद्दे मांडले जात असतात. परंतु या घटनेत दिसतेय की, पीडितेने आधीच्या म्हणण्यापेक्षा वेगळंच मनोगत मांडलं आहे.” असं देखील नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले.

“न्याययंत्रणा असल्याच्या थाटात बोलत सुटल्या आता सत्य समोर आले”

“युनायटेड नेशनन्स असेल राष्ट्रीय महिला आयोग असेल किंवा कायदा असेल त्यात सतत सांगत असतो पीडित महिलेल्या म्हणण्यावर विश्वास ठेवला पाहिजे. परंतु तिच्या म्हणण्यामध्ये किती तथ्य आहे, त्या म्हणण्यामध्ये प्रथमदर्शनी पुरावे काय आहे. परिस्थितीजन्य पुरावा काय आहे? हे तपासून घेण्याचे काम न्याययंत्रणेचं असतं, त्यामुळे आम्ही न्याययंत्रणा आहोत अशा थाटामध्ये… आपण तपास यंत्रणा असल्यासारखं बोलत सुटलो तर त्यामध्ये काय होतं ते आता समोर आलं आहे.” असा टोला नीलम गोऱ्हे यांनी चित्रा वाघ यांना लगावला आहे.

- Advertisement -

“जो तिचा जवाब असेल… आज तिने हा जवाब दिला आहे..तो कोर्टात किंवा पोलीस स्थानकात पुढील प्रक्रिया होईल त्यावेळी तिला काय वाटते हे मांडण्याचा तिला अधिकार आहे. त्यावेळी तिच्यावर दबाव होता किंवा आता दवाब आहे का काय आहे? यावर राजकारणानुसार भूमिका घेणं अजिबात योग्य नाही. मला स्वत:ला वाटतं व्यक्तीने स्वत:ला मोठं मानण्यापेक्षा मुळात भाजपचं त्या प्रतिनिधीत्व करतात त्यासंदर्भात मला दोन प्रश्न उपस्थित करावेशे वाटतात की, ज्या मुली ज्यांना अशाप्रकारे त्रास होतो त्या वेगवेगळ्या भावनिक भूमिकांमधून जातो. काही वेळेले त्यांना सुरुवातीला वाटते की, हे माझ्याच बाबतीत का झाले, आत्महत्या करावी, या माणसाला शिक्षा झालीच पाहिजे. आणि शेवटी त्या स्थिरावतात”, अस नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

“पीडितेच्या जखमांचा राजकीय द्वेषापोटी बाजार मांडण्यांचे भाजपचे वर्तन” 

“अनेक केसेसमध्ये पाहिले की, मुलींची परिस्थिती आणि अवस्था असते. याबद्दल कुठलाही विचार न करता ज्याप्रकारे त्याचं भांडवल केलं गेलं. हेतू त्या मुलीच्या न्यायापेक्षा तिच्या जखमांचा एक भांडवल केलं, मीठ चोळलं. आणि त्या जखमांचा राजकीय द्वेषापोटी बाजार मांडणं अस वर्तन भाजपकडून झालं आहे. यापार्श्वभूमीवर मुलीचा आधीचा जबाब जितका महत्त्वाच आहे तितका तिचा आत्ताचा जबाब देखील तितकाच महत्त्वाचा गणला पाहिजे,” अस मत नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं.

“चित्रा वाघांच्या पत्रकार परिषदेत पाहिले की, त्या म्हणाल्या आत्ता ती अशी बोलायला लागली, आत्ता ती तशी बोलायला लागली, मला हा अनुभव आला. हा अनुभव असा येऊ शकतो. चार केसेस तुम्हा सांभळल्या असतील तरी आम्ही पण अनुभवलं कोर्टात जाईपर्यंत मुलगी असं बोलते पण कोर्टात गेल्यानंतर वेगळं बोलते, जबाब बदलते”, असा देखील गोऱ्हे यांनी नमूद केले.

दरम्यान, एक दिशाभूल करण्याचं वातावरण तयार केलं गेलं की पीडितेला कोणीच मदत केली नाही. २५ फेब्रुवारीला पीडित मुलीचा मला फोन आला तिच्याशी मी २५ ते ३० मिनिटं बोलले. तिची तब्येत बरी नसल्याचं माझ्या लक्षात आलं. त्यानंतर तिच्या इच्छेनुसार तक्रारीसाठी मी पोलिसांशी संपर्क साधला, असंही यावेळी गोऱ्हे यांनी यावेळी स्पष्ट केलं.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -