घरताज्या घडामोडीउद्धव ठाकरेंना भेटायला आलेल्या शिवसैनिकाचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन

उद्धव ठाकरेंना भेटायला आलेल्या शिवसैनिकाचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन

Subscribe

बैठक सुरू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं त्यामुळे त्यांना कलानंगर येथील रुग्णालयात नेत असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातचा त्यांचा मृत्यू झाला.

मुंबई – शहापूर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी भगवान काळे (Bhagwan Kale) यांचे मातोश्रीबाहेर निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भेटण्यासाठी आले होते. मात्र, बैठक सुरू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं त्यामुळे त्यांना कलानंगर येथील रुग्णालयात नेत असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातचा त्यांचा मृत्यू झाला. (shivsena leader passes away out side of matoshree while meeting uddhav thackeray)

हेही वाचा – ‘या’ पाच नेत्यांनी उद्धव ठाकरेपर्यंत पोहचू दिलं नाही; शहाजी बापूंचा थेट आरोप

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अधिक सक्रीय झाले आहेत. त्यांनी नेत्यांसह पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू केल्या असून पुढील नियोजन सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, काल त्यांना शहापूर येथील शिवसेनेचे पदाधिकारी भगवान काळे भेटायला आले होते. पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं, त्यामुळे त्यांना रुग्णालयात घेऊन जात असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

आता खासदार फुटण्याची भिती

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल ४० आमदारांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली. त्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले आहे. विधानमंडळात या दोन्ही गटावरून वाद सुरू आहेत. दरम्यान, आता खासदारही फुटण्याची शक्यता आहे. याबाबत काहीही स्पष्टता समोर आलेली नसली तरीही खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत १२ आमदार संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी शिवसेना खासदार राहूल शेवाळे यांनी केली आहे. त्यामुळे तेही भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जातंय. तसंच, भावना गवळी सध्या ईडीच्या रडारवर आहेत, त्याही भाजपमध्ये जातील अशी शंका उपस्थित केली जात आहे. म्हणूनच, काल तातडीने त्यांची लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोदपदावरून हटवण्यात आले असून त्याजागी राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -