घरताज्या घडामोडीमुंबईत घडतंय काय? देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची २ तास गुप्त...

मुंबईत घडतंय काय? देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची २ तास गुप्त बैठक!

Subscribe

मुंबईत एकीकडे बॉलिवुडच्या ड्रग्ज कनेक्शनवर चर्चा सुरू असताना दुसरीकडे मुंबईतच नव्हे, तर राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची तयारी सुरू झाल्याची शक्यता आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये गुप्त भेट झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येण्याच्या वाटेवर आहेत की काय? यावर तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत. संजय राऊत यांनी शुक्रवारी एक सूचक ट्वीट केलं होतं. आजच्या त्यांच्या देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीला या ट्वीटची पार्श्वभूमी तर नाही ना? असा देखील प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. ‘किसी भी रिश्ते को कितनी भी खूबसूरती से क्यों ना बांधा जाए, अगर नजरों में इज्जत और बोलने में लिहाज ना हो, तो वह टूट जाता है’, असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं होतं. त्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत पुन्हा संसार थाटण्याच्या हालचाली शिवसेनेत सुरू आहेत का? अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.

- Advertisement -

दरम्यान, पुढील आठवड्यात देवेंद्र फडणवीस यांची दैनिक ‘सामना’मध्ये मुलाखत छापून येणार असून या मुलाखतीविषयी ही भेट झाल्याचं संजय राऊतांनी सांगितलं आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट झाली आहे. संजय राऊत यांनी सामनासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावर या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचे ठरले होते. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी, अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्याने एकदा भेटून प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाली. बिहार निवडणुकीतून परतल्यानंतर ही मुलाखत देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले आहे. या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नाही.

प्रवीण दरेकर. विरोधी पक्षनेता, विधानपरिषद

- Advertisement -

मनं इतक्या लवकर जुळणं अशक्य – सुधीर मुनगंटीवार

दरम्यान, या मुद्द्यावर एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप आणि शिवसेना इतक्या लवकर जवळ येण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं. ‘सामनामधून किंवा इतर व्यासपीठांवरून शिवसेनेनं आमचे नेते अमितभाई, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अनेकदा अनुद्गार काढले आहेत. त्यामुळे आमची मनं देखील दुखावली गेली आहेत. आणि २ तासांच्या बैठकीत ही मनं पुन्हा एकत्र येतील असं वाटत नाही’, असं मुनगंटीवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -