घरताज्या घडामोडी'मी आणि देवेंद्र फडणवीस शत्रू नाही' भाजपचं सरकार न येण्यास ते स्वतः...

‘मी आणि देवेंद्र फडणवीस शत्रू नाही’ भाजपचं सरकार न येण्यास ते स्वतः जबाबदार, संजय राऊतांचे वक्तव्य

Subscribe

आमचा पक्षाचा विस्तार करण्याचा आम्हाला आधिकार आहे. आमच्या भूमिका ठरवण्याचा अधिकार आहे. त्या भूमिका शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून ठरवतो ती संजय राऊतांची व्यक्तिगत भूमिका असल्याचे कारण नाही.

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. अवघ्या काही दिवसांवर निवडणुका आल्या असताना या राज्यांमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्राच्या बाजूला असणाऱ्या गोव्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. गोव्यात शिवसेना, भाजप, काँग्रेससह अन्य पक्षांनी तयारी सुरु केली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. गोव्यात शिवसेना खासदार संजय राऊत विरुद्ध महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि गोव्याचे भाजप निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. यामध्ये फडणवीस आणि मी शत्रू नाही असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये राऊतांनी राजकारणातील अनेक विषयांवर चर्चा केली आहे. यामध्ये त्यांना भाजप नेते देवेंद्र फडणीस विरुद्ध शिवसेना खासदार संजय राऊत असे वातावरण झालं असल्याचा प्रश्न विचारण्यात आला. यावर राऊत म्हणाले की, खरं म्हणजे चित्र कुठे होऊ नये. देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत हे एकमेकांचे व्यक्तिगत शत्रू नाही. राजकारणात मतभेद असतात आणि ते लोकशाहीत असायला हवेत. महाराष्ट्रात त्यांचे सरकार आले नाही त्याला मी जबाबदार नाही. त्याला जबाबदार ते स्वतः आहेत. त्यांनी शब्द पाळला नाही त्यामुळे ही सत्ता आली असल्याचे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

भाजप गोव्यात मुरलेले पक्ष

संजय राऊत पुढे म्हणाले की, पण आता गोव्यात खरं म्हणजे फडणवीस गोव्याचे प्रभारी आहेत. गोव्यात भाजप हा शिवसेनेपेक्षा मुरलेला पक्ष आहे. आम्ही तिथे धडपड करतो आहोत, आमचा विचार तिथल्या लोकांर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे गोव्यात देवेंद्र फढणवीस यांनी संजय राऊत यांना शिवसेनेचे राजकीय शत्रू मानू नये. आमचा पक्षाचा विस्तार करण्याचा आम्हाला आधिकार आहे. आमच्या भूमिका ठरवण्याचा अधिकार आहे. त्या भूमिका शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून ठरवतो ती संजय राऊतांची व्यक्तिगत भूमिका असल्याचे कारण नाही.

देवेंद्र फडणवीस शिवसेना संजय राऊतांना शत्रू का मानतात

शिवसेनेचा मी प्रमुख नेता आहे. पक्षाचे काम करण्यासाठी गोव्यात जातो. माझी लढाई काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, केजरीवालांसोबत लढतो आहोत. त्यांच्याशी उत्तम संबंध असतानाही आम्ही लढतो आहोत ते आमचे नाव घेत नाहीत परंतु देवेंद्र फडणवीस हे शिवसेना, संजय राऊत यांना आपले शत्रू का माणतात याचे कारण त्यांना असे वाटत आहे की, गोव्यात जर शिवसेना वाढली आणि रुजली तर भाजपची घट्ट रुजलेली पाळमुळ आहेत ती कुठेतरी कमकुवत होतील. कारण आम्ही सुद्धा त्याच विचाराचे आहोत. गोव्यात आज ज्या प्रकारे माफियांचे राज्य सुरु आहे. ड्रग्ज माफिया, लॅंड माफिया पैशाचा आतोनात वापर सुरु आहे. आता काही दिवसांनी विमाने उतरतील, हेलिकॉप्टर उतरतील ही काय आमची ताकद नाही पैसे वाटायची कदाचित काँग्रेससुद्धा वाटणार नाही. प्रमुख पक्ष कोणता असेल ज्यांच्याकडे पैसे आहे तो सत्तेत असलेला पक्ष आहे. त्याच्यावर निवडणूक आयोगाने लक्ष ठेवले पाहिजे असे संजय राऊत म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : Nana Patole on PM: नाना पटोले वादात अमृता फडणवीसांची उडी, ट्विट करत साधला निशाणा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -