घरताज्या घडामोडीविरोधकांची आदळआपट म्हणजे वादळ नाही, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

विरोधकांची आदळआपट म्हणजे वादळ नाही, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

Subscribe

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवार ३ मार्चपासून सुरु होत आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्प अधिवेशनाची सुरुवात होईल. या अधिवेशनात महाविकास आघाडीला घेरणार असल्याचे विरोधकांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान हे अधिवेशन गाजेल आणि वाझेल असे सांगण्यात आले परंतु विरोधकांची आदळआपट म्हणजे वादळ नाही असा पलटवार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर केला आहे. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी चर्चा करावी, प्रश्न विचारावे त्याला ठाकरे सरकार उत्तर देईल असे संजय राऊत म्हणाले आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी संजय राऊत म्हणाले की, आदळआपट करणे म्हणजे वादळ नाही. आदळआपट करुन प्रश्न सुटणार नाहीत. महाविकास आघाडीला साधा चरोटा उठणार नाही. बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नेत्यांची बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी सागितले आमची १७० आमदारांची ताकद कायम आहे. त्याच्यामुळे कसले वादळ निर्माण करणार तुम्ही कुठेतरी फुंकर मारतात आणि म्हणतात वादळ आले. असे काही वादळ येत नाही असे संजय राऊत म्हणाले आहेत.

- Advertisement -

वादळ अडीच वर्षांपूर्वी आले तेव्हा सगळे झोपले

वादळ अडीच वर्षांपूर्वी आले होते तेव्हा सगळे झोपले ते अजून उठले नाही. अधिवेशन उत्तम प्रकारे चालावे राज्याच्या प्रश्नावर चर्चा व्हावी. विरोधकांना अधिकारी आहे प्रश्न विचारण्याचा, संसदीय लोकशाही मानतो, भले लोकसभेत त्या लोकशाहीला किंमत नाही परंतु महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेला फार मोठी परंपरा आहे. परंपरेनुसार विरोधी पक्षाने काम करावे. विरोधकांच्या प्रश्नाला सरकार उत्तर देईल आणि हे राज्याच्या हिताचे असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थित राहणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवेशनाला उपस्थित राहतील. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री राज्यातील कार्यक्रमांना सक्रिय झाले असून उपस्थित राहत आहेत. भविष्यात मुख्यमंत्री अधिक सक्रिय होती महाराष्ट्रात जातील महाराष्ट्रात फिरतील आणि महाविकास आघाडीला महाराष्ट्रात सक्षम करण्यासाठी त्यांचे नेतृत्व अधिक फायदेशीर ठरेल.

- Advertisement -

हेही वाचा : माझे १७० मोहरे फोडून दाखवा, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उद्धव ठाकरेंचं विरोधकांना आव्हान

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -