घरमहाराष्ट्रकोकणात नीलेश राणे - विनायक राऊत वाद थांबता थांबेना

कोकणात नीलेश राणे – विनायक राऊत वाद थांबता थांबेना

Subscribe

रत्नागिरी-सिंधूदुर्ग लोकसभा मतदार संघातील विद्यमान खासदार विनायक राऊत व माजी खासदार नीलेश राणे यांच्यातील वाद संपण्याचे नाव नाही. गेले काही दिवस शाब्दिक द्वद्व सुरु असतानाच शुक्रवारी ओरोस येथील खासदार राऊत यांच्या कार्यालयासमोर नीलेश राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलाचा हार घालत शिवसैनिकांनी जोडे मारो आंदोलन केले. तर भाजपकडूनही खासदार विनायक राऊत यांचा पुतळा जाळण्याचा प्रकार शुक्रवारी घडला. त्यामुळे विनायक राऊत विरूद्ध नीलेश राणे हे प्रकरण येत्या दिवसात आणखी चिघळणार हे आता स्पष्ट होत आहे.

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्या सारख्या नॉन मॅट्रिकमानूस केंद्रात मंत्री झाल्यास ते दुर्दैव असेल अशी टिपण्णी केली होती. त्यामुळे संतापलेल्या माजी खासदार नीलेश राणे यानी ‘राऊत तुझे दिवस भरले आहेत. दिसशील तिथे तुला मारणार’ अशा शब्दातली धमकी निलेश राणे यांनी दिली होती. त्यानंतर सेना आ वैभव नाईक यांनी शिवसैनिकच नीलेश राणे यांना मारतील, असा इशारा दिला. यानंतर हा शाब्दिक वाद अधिकच रंगत गेला.

- Advertisement -

आरोप-प्रत्यारोप रंगलेले असताना गुरुवारी जिल्हा प्रमुख संजय पडते यानी प्रेस घेत वेळ आणि ठिकाण सांगा, असा इशारा नीलेश राणे यांना दिला होता. त्यानंतर आज शिवसेना अधिकच आक्रमक झाली. ओरोस येथील विनायक राऊत संपर्क कार्यालयासमोर नीलेश राणे यांच्या पुतळ्याला चप्पल हार घालत मारहाण केली. तसेच पोलिस अधीक्षक यांना निवेदन देत नीलेश राणे यांच्या वक्तव्यामुळे सिंधूदुर्गची शांतता भंग झाली आहे. तसेच नीलेश राणे यांचे कार्यकर्ते सोशल मिडियावर राऊत यांच्या विरोधात भाष्य करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था बिघडणार आहे, असे नमूद केले आहे. जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जान्हवी सावंत यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपकडूनही विनायक राऊतांचा पुतळा जाळला 

शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलानं झोडत सावंतवाडीत पुतळा जाळण्यात आला. भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या रणरागिणींनी पुतळ्याला जोडे हाणत शिवसेनेला जशास तस उत्तर देण्यात आलं. यावेळी खासदार विनायक राऊत व शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, पं.स. सभापती मानसी धुरी, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, युवा शहर अध्यक्ष संदेश टेमकर, बांदा सरपंच अक्रम खान, शहर अध्यक्षा मोहीनी मडगावकर, नगरसेवक आनंद नेवगी, नेमळे सरपंच विनोद राऊळ, बंटी पुरोहित, दिलीप भालेकर, संजय नाईक, नगरसेविका दिपाली भालेकर, समृद्धी विरनोडकर, परिणीती वर्तक, मिसबा शेख आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

बातमीदार – तेजस्वी काळसेकर


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -