…तर त्यांच्या कानाखाली आवाज काढा, बंडखोर आमदार संतोष बांगर भडकले

santosh bangar

हिंगोलीच्या जिल्हाध्यक्ष पदावरून शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांची शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करण्यात आली. परंतु त्यांची हकालपट्टी केल्यानंतर संतोष बांगर चांगलेच आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. मुंबईत शक्तीप्रदर्शन केल्यानंतर संतोष बांगर यांनी आज हिंगोलीत शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जे कोणी आपल्याला गद्दार म्हणत असेल, तर त्याच्या कानाकाली आवाज काढा, असं संतोष बांगर म्हणाले.

मला सर्व शिवसैनिकांना एकच सांगायचं आहे की, आपण शिवसैनिक आहोत. जे कोणी आपल्याला गद्दार म्हणत असेल, तर त्याच्या कानाखाली आवाज काढा. आम्ही भिणारे शिवसैनिक नाही. आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत. आम्हाला जर कोणी का रे म्हणाल तर त्याच्या कानाखाली आम्ही जाळ काढल्याशिवाय राहणार नाही, असं बांगर म्हणाले.

मला कोणीही जिल्हाध्यक्ष पदावरून काढू शकत नाही. त्यांनी मुंबईत शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या सह्याद्री गेस्ट हाऊसबाहेर शक्तीप्रदर्शन केले. बांगर यांचे समर्थक जवळपास २० ते २५ बसमध्ये आले होते. यावेळी बांगर यांच्यासह समर्थकांनी हमारा नेता कैसा हो एकनाथ भाई जैसा हो, अशी घोषणाबाजी केली.


हेही वाचा : मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त आणि वाहतूक कोंडीतून सुटण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश